Bazil: ‘‘स्वच्छ ऊर्जेकडे वाटचाल करण्यासाठी भारत वेगाने पावले उचलत आहे. देश जगातील चौथ्या क्रमांकाचा नूतनीकरणीय ऊर्जा उत्पादक आणि तिसरा क्रमांकाचा सौरऊर्जा उत्पादक झाला आहे,’’ असे प्रतिपादन केंद्रीय पर्यावरणमंत्री भूपेंद्र यादव यांनी केले. बेटांवर वसलेल्या विकसनशील देशांना ऊर्जा सुरक्षेला बळकटी देण्यासाठी समन्वित जागतिक प्रयत्नांची गरज त्यांनी अधोरेखित केली. सौरऊर्जा ही परिवर्तन आणि सामाजिक क्रांतीचे साधन आहे, असेदेखील ते म्हणाले. .ब्राझीलमधील बेलेम येथे संयुक्त राष्ट्रांच्या ‘कॉप-३०’ हवामान परिषदेमध्ये आंतरराष्ट्रीय सौर मित्रत्व-विकसनशील देश या व्यासपीठावर उच्चस्तरीय पदाधिकाऱ्यांच्या परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, ‘‘भारताने ५०० गिगावॉट ऊर्जानिर्मितीचे लक्ष्य ओलांडले असून, यापैकी ५० टक्क्यांहून अधिक योगदान नूतनीकरणीय ऊर्जास्रोतांचे आहे ‘पीएम सूर्यघर’ या योजनेच्या माध्यमातून भारतातील अनेक घरांच्या छतांवर सौरऊर्जा उपकरणे बसविण्यात आली आहेत..Solar Powered Irrigation: सूर्यकिरणांवर चालणारे सिंचन आहे शेतकऱ्यांसाठी फायदेशीर तंत्रज्ञान!.२० लाखांहून अधिक कुटुंबांनी ही यंत्रणा स्वीकारली आहे. जीवाश्म इंधनांवरील अवलंबित्व, तोकड्या पायाभूत सुविधा यांमुळे बेटांवर वसलेले विकसनशील देश असुरक्षिततेला सामोरे जातात. परवडणारी, स्वच्छ आणि सक्षम ऊर्जा यंत्रणा मोठ्या प्रमाणावर उभारण्यासाठी सामूहिक कृती अत्यावश्यक आहे. स्थानिक क्षमतावृद्धीच्या माध्यमातून सौर तंत्रज्ञानाचा वापर वाढवणे आवश्यक आहे.’’.‘कार्बन उत्सर्जन कमी करणारे तंत्रज्ञान हवे’‘‘जागतिक हवामान कृतीस चालना देण्यासाठी कार्बन उत्सर्जन घटविणाऱ्या तंत्रज्ञानाची देवाणघेवाण हे एक महत्त्वाचे साधन म्हणून उदयास आले आहे. कार्बन उत्सर्जनाबाबतच्या तंत्रज्ञानाला गतीही त्यामुळे शक्य होणार आहे. या माध्यमातून उर्त्सजनाबाबतचे भारताने ठरविलेले लक्ष्य साध्य होऊ शकते,’’ अशी भूमिका भारताने जागतिक हवामान परिषदेच्या (कॉप-३०) पार्श्वभूमीवर मांडली आहे. पर्यावरणमंत्री भूपेंद्र यादव यांनी कार्बन उत्सर्जन घटविणाऱ्या तंत्रज्ञानाच्या देवाणघेवाण करण्यासाठी आवश्यक रूपरेषेची गरज यावेळी अधोरेखित केली..Solar Power : सांगली जिल्ह्यातील अंगणवाड्यांमध्ये होतेय सौर ऊर्जेवर वीजनिर्मिती.भारत-जपान भागीदारीभारत-जपान हवामान नियंत्रण क्षेत्रातील भागीदारीवर यादव यांनी भाष्य केले. ते म्हणाले. सरकार, खासगी संस्था यांना एकत्रितपणे प्रकल्प राबविण्याची परवानगी देणे, त्यासाठी अर्थसाह्य आणि प्रगत तंत्रज्ञान उभारणे आदी गोष्टी महत्त्वाच्या आहेत. ही यंत्रणा बहुपक्षीय हवामान उद्दिष्टांना व्यवहार्य आणि परस्पर हितासाठी पूरक ठेवण्याचे काम करते. कार्बन उत्सर्जन रोखण्यासाठीचे तंत्रज्ञान आपल्या दीर्घकालीन उद्दिष्टांना गती देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल..पर्यावरणमंत्र्यांच्या गाठीभेटीबेलेम : पर्यावरणमंत्री भूपेंद्र यादव यांची ब्राझीलमध्ये सुरू असलेल्या संयुक्त राष्ट्रांच्या ‘कॉप-३०’ शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर चीनच्या हवामान बदलासाठीच्या विशेष दूत लियू झेनमिन यांची भेट घेतली. याशिवाय क्युबाचे विज्ञान, तंत्रज्ञान आणि पर्यावरण मंत्री सी. आर्मंडो रॉड्रिग्ज बातिस्ता यांची देखील भेट घेतली. या भेटीदरम्यान दोन्ही देशांमधील नूतनीकरणीय ऊर्जा क्षेत्रातील सहकार्याच्या शक्यतांवर चर्चा झाली. यादव यांनी ‘एक्स’वर पोस्ट करून याची माहिती दिली. ‘शाश्वत ऊर्जा, नूतनीकरणीय ऊर्जा क्षेत्रातील संभाव्य सहकार्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी विविध मुद्द्यांवर चर्चा झाली,’ असे यादव यांनी ‘एक्स’वर म्हटले आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.