Mumbai News: इंडियन सीड असोसिएशनच्या वतीने तीन दिवसीय बियाणे परिषदेत जगभरातील १२०० व्यापाऱ्यांनी बियाणे कंपन्यांशी अंदाजे तीन हजारांवर सामंजस्य करार केले. जिओ वर्ल्ड सेंटर येथे आयोजित आशियाई बियाणे काँग्रेसमध्ये आशिया, आफ्रिका, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि युरोप खंडातल्या ५० पेक्षा जास्त देशातल्या बियाणे उद्योगातल्या प्रतिनिधींचा सहभाग होता. या परिषदेत दोन दिवस चाललेल्या चर्चासत्रांमध्ये भारतासह अनेक देशातल्या मान्यवरांनी बियाणे उद्योगाच्या वाढीसाठी आणि पर्यायाने शेतकऱ्यांच्या विकासासाठी काही मार्गदर्शक बाबींवर भर दिला. .गोवा येथे २०१५ मध्ये सीड काँग्रेसचे आयोजन करण्यात आले होते. पण त्यानंतर तब्बल १० वर्षांनी मुंबईत आशियाई सीड काँग्रेसचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेत बियाण्यांचे प्रदर्शनही भरविण्यात आले. व्यापारी आणि कंपन्यांमध्ये या बैठकीत सामंजस्य करार केले. बियाणे, बियाण्याचे तंत्रज्ञान, लागवड, संशोधन यांची देवाण घेवाण करण्यासाठी सामंजस्य करार केले..Indian Seed Congress 2024 : निकृष्ट बियाणे नियंत्रण आराखडा स्वीकारणार.एशिया पॅसिफिक सीड अलायन्स उपाध्यक्ष ताकाहिरो आन्दो म्हणाले ‘‘भारतात झालेल्या आशियाई सीड काँग्रेसमध्ये आम्ही खूप समाधानी आहोत. इथे बियाणे उद्योजकांमध्ये खूप चांगला संवाद झाला, बियाणे उद्योजकांमध्ये खूप चांगली देवाण घेवाण झाली. आमच्या संस्थेचा जगभरातल्या शेती क्षेत्रातल्या विकासात मोठी भूमिका आहे. जपान आणि भारतात बियाण्यांचे मोठे मार्केट आहे. भविष्यात ते मोठ्या प्रमाणात विस्तारणार आहे. त्यासाठीदेखील हे आयोजन फायद्याचे ठरले.’’.बियाणे निर्यात ५ हजार कोटींवर नेण्याचा निर्धारभारतीय बियाणे उद्योगातील निर्यात ८०० कोटी रुपयांवरून येत्या पाच वर्षांत पाच हजार कोटींपेक्षा जास्त नेण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. भारताला बियाणे उद्योगाचे जागतिक हब बनण्यासाठी अतिशय उपयुक्त स्थिती आहे. त्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी या सीड काँग्रेसचा खूप मोठा फायदा होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला..Indian Seed Congress : पुण्यात आजपासून ‘इंडियन सीड कॉंग्रेस’ दर्जेदार बियाणे उत्पादनासंबंधी होणार मंथन.भारतीय बियाणे उद्योगात गुंतवणुकीसाठी आणि भारताला बियाणे उत्पादनवाढीत मला मोठ्या संधी दिसत आहेत. भारतात येत्या काळात बौद्धिक संपदा कायद्यात सुधारणा होत आहे. त्याचा या क्षेत्रात गुंतवणूक वाढीसाठी फायदा होईल. याचा भारताला बियाणे उद्योगाचे जागतिक हब होण्यास फायदा होईल. तसेच भारताची अन्नसुरक्षा आणि मजबूत होईल, अशी आम्हाला अपेक्षा आहे.- टेक वा को, अध्यक्ष, एशिया पॅसिफिक सीड अलायन्स.सध्या कंपन्या आणि सरकारसमोर बोगस बियाणांचे संकट आहे. यासाठी राज्य सरकारने केंद्राच्या कायद्याच्या आधारे कडक कारवाई करणे अपेक्षित आहे.- एम. प्रभाकर राव, अध्यक्ष, नॅशनल सीड असोसिएशन ऑफ इंडिया.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.