Toxic Free Agriculture : विषमुक्त शेती करण्याचा संकल्प

तीन दिवस चाललेल्या या महोत्सवात शेतकऱ्यांना सेंद्रिय भोजन देण्यात आले. समारोपाच्या सत्रात सन्मानपत्र देऊन शेतकऱ्यांचा गौरव करण्यात आला.
Indian Agricultural
Indian AgriculturalAgrowon
Published on
Updated on

Buldhana News : शेतकऱ्यांनी स्वतःच्या कुटुंबासाठी विषमुक्त अन्न पिकवावे आणि दुर्धर आजारांपासून वाचावे या उद्देशाने सालईबन (ता. जळगाव जामोद) येथे तीन दिवस सातपुडा बीजोत्सव घेण्यात आला.

सायाळ सेंद्रिय शेती (Organic Farming) समूह, तरुणाई फाउंडेशन (खामगाव) यांनी संयुक्तपणे हे आयोजन केले होते.

४० वर्षांपासून सेंद्रिय शेती करणारे व देशात विषमुक्त अन्नाची चळवळ सुरू ठेवणारे वसंत फुटाणे, केरळमधील शमिका व इलियास, मध्य प्रदेशातील सुभद्राताई यांनी या महोत्सवात सहभागी शेतकऱ्यांना कृतिपूर्ण मार्गदर्शन केले.

प्रताप मारोडे, प्रतीक उंबरकर, मंगेश पाटील यांनी शेती कृती आराखडा, गटचर्चेचे संयोजन केले.

Indian Agricultural
Indian Agriculture : शेती व्यवसाय बंधनमुक्त करावा

सेंद्रिय शेतकऱ्यांच्या अनुभवांची देवाणघेवाण, सेंद्रिय शेतीमालाची मार्केटिंग, आरोग्यावरील परिणाम, शेतीवरील संतविचार, कृषी आधारित प्रक्रिया उद्योग, शेती विषयावरील महत्त्वाची पुस्तके, आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष, जागतिक स्तरावर भारतीय सेंद्रिय मालाची मागणी, देशी बिजांची उपलब्धता, शेतकऱ्यांना सापळ्यात ओढणाऱ्या कंपन्या आदी अनेक विषयांवर या दरम्यान माहिती देत चर्चा करण्यात आली.

प्रणाली चिकटे या विद्यार्थिनीने सेंद्रिय शेतीचे महत्त्व सांगितले. शीतल पडोळ यांनी लिहिलेल्या ‘सालईबनातील रानभाज्या’ या पुस्तिकेचे प्रकाशन या वेळी करण्यात आले.

बियांपासून बनवलेल्या राख्या (बीजबंधन), बीज बॅचेस, संदेश टोपी, अंबाडी शरबत, सुचिता उमाळे यांनी तांबे पितळेच्या आरोग्यदायी भांड्यांची केलेली व भरड धान्याची आरास, पारंपरिक कृषी साहित्य, स्वागतासाठी कृषी गीते, कृषीवरील संत वचनांचे पेंटिंग्ज हे सोहळ्याचे वैशिष्ट्य ठरले.

तीन दिवस चाललेल्या या महोत्सवात शेतकऱ्यांना सेंद्रिय भोजन देण्यात आले. समारोपाच्या सत्रात सन्मानपत्र देऊन शेतकऱ्यांचा गौरव करण्यात आला.

जळगाव खानदेशचे कृषी उपसंचालक अनिल भोकरे यांचे शाश्‍वत शेतीवर व कृषी विज्ञान केंद्राचे विषयतज्ज्ञ संजय उमाळे यांचे नैसर्गिक शेतीवर मार्गदर्शन झाले. मंजितसिंग शीख व राजेंद्र कोल्हे यांनी प्रदर्शनाची मांडणी केली होती.

Indian Agricultural
Residue Free Agriculture : विषमुक्त शेती हेच हवे लक्ष्य

या प्रदर्शनाला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संतोष डाबरे, आकाशवाणीचे सेवानिवृत्त निवेदक सतीश पप्पू, अपर पोलिस अधीक्षक अशोक थोरात, जळगावचे ठाणेदार दिनेश झांबरे, तालुका कृषी अधिकारी जळगाव श्री. वाकोडे, अमोल बनसोड, अपर्णा संजय कुटे, अविनाश उमरकर आदींनी भेट दिली.

महात्मा गांधी लोकसेवा संघ, सुनगाव ग्रामपंचायत, मानवता फार्म तालखेडा, सुमती ट्रस्ट पुणे, ऑरगॅनिक फार्मर्स असोसिएशन ऑफ इंडिया या संस्थांनी यासाठी सहकार्य केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com