Exotic Fruit Agrowon
यशोगाथा

Exotic Fruits: चाळीस देशांतली सातशे फळे लावणारा अवलिया

आपल्या विदेशातील मित्रांकडून तिथल्या फळांच्या बिया गोळा करून त्याने शेतात लागवड करायला सुरुवात केली. काही बिया मित्रांकडून मिळाल्या तर काही रोपे वेगवेगळ्या नर्सरीमधून आणली.

टीम ॲग्रोवन

पुण्याला एमपीसीसी करायला गेलेलं पोरगं एकदा गावाला परत येतंय. त्याचा ऐंशी वर्षांचा आजोबा आपल्या थरथरत्या हाताने आंब्याचं झाड (Mango Tree) लावत असतोय. नातवाला गंमत वाटते. एक पाय तिरडीत पोहचला तरी म्हातारं शांत बसत नाही. नातू आजोबाला म्हणतो, ``अण्णा, आता कुठे तुम्ही या झाडाचं आंबा (Mango) खाणार ? कशाला एवढी दगदग करताय?`` आजोबा हसतंय आणि म्हणतंय, ``लेकरा, गेली अनेक वर्ष ज्या झाडाचा आंबा आपण खातोय तो माझ्या आज्ज्या पंज्याने लावलाय. मी आज झाड लावली तर तुझ्यासकट माझ्या पुढच्या पिढ्या आंबे खातील. मी तुमच्यासाठी आंबे लावतोय, माझ्यासाठी नाही.``

ही कथा काल्पनिक म्हणायची किंवा नाही हा ज्याचा त्याचा मुद्दा. पण भारतीय शेतकऱ्यांच्या रक्तातच हा गुण रुजलेला.

असाच आपल्या शेतकरी वाडवडिलांना बघत मोठा झालेला एक युवक तब्बल ४० देशांतील ७०० फळांची लागवड (&00 Fruit Cultivation) आपल्या शेतात करतोय. त्याचे वडील फणस (Jackfruit) आणि आंब्याच्या फळबागांची लागवड करायचे. पण त्याने मात्र यावरचं समाधान न मानता फळांच्या विदेशी वाणांचे उत्पादन (Exotic Fruits Production) घेण्यास सुरुवात केली. या शेतकरी युवकाचे नाव आहे अनिल बालांजा (Anil Balanja). वयाच्या १९व्या वर्षी त्यांना शेती व्यवसायाची गोडी लागली आणि मग सुरू झाला नव्या प्रयोगांचा प्रवास.

आपल्या विदेशातील मित्रांकडून तिथल्या फळांच्या बिया गोळा करून त्याने शेतात लागवड करायला सुरुवात केली. काही बिया मित्रांकडून मिळाल्या तर काही रोपे वेगवेगळ्या नर्सरीमधून आणली.

सुरुवातीला सुपारी, नारळ आणि रबराच्या शेतीपासून झालेली त्यांची सुरुवात आता ७०० प्रकारच्या फळांपर्यंत पोहोचली आहे. कर्नाटकतल्या दक्षिण-कन्नड जिल्ह्यात राहणारे अनिल गेल्या २० वर्षांपासून फळबागांची शेती करत आहेत. गेल्या पाच वर्षांपासून त्यांनी विदेशी फळांची लागवड करण्यास सुरुवात केली. भारतामध्ये दुर्मिळ असणाऱ्या फळांमध्ये अवॅकॅडो, मलेशियातील संटोल, इंडोनेशियातील केपेल यासारख्या फळांचे उत्पादन त्यांनी घेतले.

फळझाडांची लागवड करत असताना अनिल काही गोष्टी कटाक्षाने पाळतात. त्यांनी प्रत्येक फळाच्या इत्यंभूत नोंदी ठेवल्या आहेत. फळाचे नाव, त्याला आवश्यक असं तापमान, मातीचा प्रकार, एवढेच नाही तर त्याचे वैज्ञानिक नाव आणि औषधीय गुणांची नोंद देखील त्यांनी ठेवली आहे. यातून त्यांनी स्वतःची नर्सरी उभारून त्या विदेशी फळांची रोपे तयार करण्यास सुरुवात केली आहे.

या युवकाने आपल्या ३० एकर क्षेत्रात कोय नसलेला आंबा, फणस, लिंबू आणि जांभूळ यासारख्या फळांचं उत्पादन घेतलयं. ब्राझीलच्या बिरीबा नावाच्या सीताफळ प्रजातीच्या लागवडीपासून सुरू झालेला त्यांचा प्रवास आता मलेशिया, कंबोडिया, व्हिएतनाम आणि थायलंड सारख्या देशांपर्यंत पोहोचलाय. अर्थात त्यांच्या शेतात या देशातील फळांच उत्पादन घेण्यात येतं. त्यांच्या फळांना आज मोठं मार्केट मिळालंय. इतकंच नाही तर त्यांचा हा प्रयोग आज बऱ्याच तरुण शेतकऱ्यांनी करायचं ठरवलंय.

म्हणूनच सुरवातीला सांगितलेल्या स्टोरी प्रमाणे अनिल बालांजा यांनी लावलेली ही झाडं फक्त त्यांच्या पुढच्या पिढ्यांसाठीच नाही तर अनेक शेतकऱ्यांच्या कित्येक पिढ्याच कल्याण करणारी ठरतील हे मात्र नक्की.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Assembly Election Counting : पोस्टल मतमोजणीत मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आघाडीवर; अजित पवार पिछाडीवर

Maharashtra Election Results 2024 : पोस्टल मतदानात कोल्हापूर, सांगली, साताऱ्यातून पहिला कल हाती

Election 2024 Maharashtra: सुरुवातीच्या कलात महायुतीचं पारडं जड; महाविकास आघाडी देते टक्कर

Sugarcane Harvesting : निवडणूक आटोपली, खानदेशात ऊस तोड सुरू करा

Cashew Cluster Scheme : सिंधुदुर्ग-रत्नागिरीसाठी काजू क्लस्टर योजना

SCROLL FOR NEXT