Rain Gauge Maharashtra agrowon
हवामान

Maharashtra Rain: राज्यातील ९ जिल्ह्यांमध्ये पावसाचा येलो अलर्ट; काही भागात उद्याही पावसाचा अंदाज

Rain Forecast : हवामान विभागाने आज आणि उद्या अनेक भागात ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाचा अंदाज व्यक्त केला.

अनिल जाधव

Pune News : राज्यातील काही भागात आज पावसाने हजेरी लावली. तर अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण होते. हवामान विभागाने आज आणि उद्या अनेक भागात ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाचा अंदाज व्यक्त केला.

राज्यात काही ठिकाणी हलका पाऊस पडत आहे. सिंधुदूर्ग जिल्ह्यातील रामेश्वर, कणकवली, देवगड, वैभववाडी येथे तर रत्नागिरी जिल्ह्यातील खेड, गुहागर आणि राजापूर मध्ये काही ठिकाणी पाऊस पडला.

पुणे, सातारा, नाशिक, जळगाव जिल्ह्यातील काही भागात हलक्या सरी पडल्या. हवामान विभागाने कोकण, मध्य महाराष्ट्र, खानदेश आणि मराठवड्यातील काही भागात आज पावसाचा अंदाज दिला.

हवामान विभागाने आज पुणे, नगर, नाशिक, धुळे, जळगाव, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडासह हलक्या पावासाचा येलो अलर्ट दिला.

तसेच यावेळी ३० ते ४० किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहतील, असाही अंदाज व्यक्त केला. तसेच कोकणातील सिंधुदूर्ग, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात काही भागात विजांसह हलक्या सरी पडतील, असा अंदाज आहे.

मराठवड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि धाराशिव जिल्ह्यातही काही भागात हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. तसेच इतर भागातही ढगाळ वातावरणासह पावसाची शक्यता व्यक्त केली.

उद्या म्हणजेच बुधवारी रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड या जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरणासह काही ठिकाणी हलक्या सरीही पडतील, असा अंदाज हवामान विभागाने दिला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Women Farmers Contribution: मोरोक्कोच्या बहरलेल्या शेतीतील अदृश्य हात

Interview With Rakesh Kaithwas : शेतकरी कंपन्यांच्या बळकटीकरणातून मूल्यवर्धनाला चालना

Bullock Safety Tips: बैलाच्या वजनानुसार बैलगाडीत किती ऊस भरावा?

Citrus Spider Mite Infestation: लिंबूवर्गीय पिकांवरील जाळी-विणणारा कोळी

Maratha Reservation Protest: मनोज जरांगेंचा मराठा मोर्चा १९ सप्टेंबरला मंुबईत धडकणार

SCROLL FOR NEXT