Cold Weather : सौम्य ते मध्यम थंडी; ढगाळ हवामान

Weather Update : संपूर्ण राज्यात कमाल व किमान तापमान सरासरीपेक्षा १.६ ते ३ अंश सेल्सिअसपर्यंत अधिक राहील. त्यामुळे थंडीचे प्रमाण सौम्य ते मध्यम स्वरूपात या आठवड्यात राहील. तसेच राज्यभर हवामान ढगाळ राहील.
Cold Weather
Cold WeatherAgrowon
Published on
Updated on

डॉ. रामचंद्र साबळे

या आठवडाभर महाराष्ट्रावर १०१२ हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब राहील. याचाच अर्थ संपूर्ण राज्यात कमाल व किमान तापमान सरासरीपेक्षा १.६ ते ३ अंश सेल्सिअसपर्यंत अधिक राहील. त्यामुळे थंडीचे प्रमाण सौम्य ते मध्यम स्वरूपात या आठवड्यात राहील. तसेच राज्यभर हवामान ढगाळ राहील.
प्रशांत महासागराच्या पाण्याचे पृष्ठभागाचे तापमान विषववृत्तीय भागांत २९ अंश सेल्सिअसपर्यंत कमी झाले आहे. हिंदी महासागर व अरबी समुद्राच्या पाण्याचे पृष्ठभागाचे तापमान वाढले असून, ते ३० अंश सेल्सिअस इतके आहे. त्यामुळेच अरबी समुद्र व हिंदी महासागरावरील हवेचे दाब कमी होऊन त्या ठिकाणी हवेच्या कमी दाबाची क्षेत्रे निर्माण होत आहेत. पाण्याचा बाष्पीभवनाचा वेग वाढत आहे. वारे चक्राकार वाहण्यामुळे महाराष्ट्रावर येणारे वारे बाष्प वाहून आणत आहेत. ही स्थिती ‘एल निनो’चा प्रभाव संपुष्टात आल्याचे दर्शवत आहे.

नाशिक, धुळे, जळगाव, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगर, बुलडाणा, अकोला, वाशीम, सांगली, सोलापूर, पुणे व नगर जिल्ह्यांत वाऱ्याचा ताशी वेग १५ ते १८ किमी राहील. वाऱ्याची दिशा सर्वच जिल्ह्यांत प्रथम आग्नेयेकडून आणि नंतर नैर्ऋत्येकडून राहील. त्याचा परिणाम ढगाळ हवामान आणि थंडीवर होईल.

सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, धाराशिव, लातूर, बीड, हिंगोली, कोल्हापूर, सांगली, सातारा व पुणे जिल्ह्यांत अल्पशा पावसाची शक्यता निर्माण होईल. तसेच हवामान ढगाळ राहील. थंडीचे प्रमाण कमी राहील. दिवसा व रात्री हवामान थंड राहील.

कोकण :
कमाल तापमान रायगड, ठाणे व पालघर जिल्ह्यांत ३१ अंश सेल्सिअस, तर सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत ३२ अंश सेल्सिअस राहील. सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत किमान तापमान २० अंश सेल्सिअस, रायगड जिल्ह्यात २१ अंश सेल्सिअस, तर ठाणे आणि पालघर जिल्ह्यांत २२ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील.

सकाळची सापेक्ष आर्द्रता सिंधुदुर्ग, रत्नागिरी व रायगड जिल्ह्यांत ७१ ते ८० टक्के राहील. मात्र ठाणे व पालघर जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ५५ ते ५६ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता सर्वच जिल्ह्यांत ३६ ते ३८ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ८ ते ११ कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा आग्नेयेकडून राहील. सिंधुदुर्ग जिल्ह्यात १.७ मि.मी., रत्नागिरी जिल्ह्यात २.०० मि.मी., रायगड जिल्ह्यात २.८ मि.मी., ठाणे जिल्ह्यात १.२ मि.मी. पावसाची शक्यता आहे. पालघर जिल्ह्यात पावसाची शक्यता नाही.

Cold Weather
Weather Update : मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाची शक्यता

उत्तर महाराष्ट्र :
कमाल तापमान नाशिक जिल्ह्यात २७ अंश सेल्सिअस, तर धुळे व नंदूरबार जिल्ह्यांत २८ अंश सेल्सिअस. जळगाव जिल्ह्यात कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान धुळे व नंदूरबार जिल्ह्यांत २२ अंश सेल्सिअस, तर जळगाव जिल्ह्यात २१ अंश सेल्सिअस आणि नाशिक जिल्ह्यात १९ अंश सेल्सिअस राहील.

धुळे, नंदूरबार व जळगाव जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ, तर नाशिक जिल्ह्यात आकाश निरभ्र राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ५० ते ५७ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ३२ ते ३७ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग धुळे जिल्ह्यात ताशी २१ कि.मी. तर नाशिक व जळगाव जिल्ह्यांत ताशी १६ कि.मी. व नंदूरबार जिल्ह्यात ताशी १२ कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा आग्नेयेकडून राहील.

मराठवाडा :
कमाल तापमान धाराशिव व जालना जिल्ह्यांत २८ अंश सेल्सिअस, तर लातूर, नांदेड, बीड, परभणी, हिंगोली व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत २७ अंश सेल्सिअस राहील. धाराशिव जिल्ह्यात किमान तापमान १८ अंश सेल्सिअस, तर लातूर जिल्ह्यात २० अंश सेल्सिअस राहील. मात्र नांदेड, बीड, परभणी, हिंगोली, जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत किमान तापमान १९ अंश सेल्सिअस राहील. सर्वच जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहील.

धाराशिव व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ७२ टक्के, तर परभणी व हिंगोली जिल्ह्यांत ६० टक्के राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता लातूर, नांदेड, बीड व जालना जिल्ह्यांत ६५ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता धाराशिव, लातूर व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत ४० ते ४५ टक्के, तर धाराशिव जिल्ह्यात ५० टक्के राहील. बीड, परभणी, हिंगोली व जालना जिल्ह्यांत दुपारची सापेक्ष आर्द्रता ३५ टक्के राहील. धाराशिव, लातूर, बीड, परभणी, जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत वाऱ्याचा ताशी वेग १५ ते २० किमी राहील. वाऱ्याची दिशा आग्नेयेकडून राहील. हवामान थंड व कोरडे राहील.

पश्‍चिम विदर्भ :
कमाल तापमान अकोला जिल्ह्यात २९ अंश सेल्सिअस, तर बुलडाणा, वाशीम व अमरावती जिल्ह्यांत २८ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान अमरावती जिल्ह्यात १९ अंश सेल्सिअस, तर वाशीम, अकोला व बुलडाणा जिल्ह्यांत २० अंश सेल्सिअस राहील. अमरावती जिल्ह्यात आकाश निरभ्र राहील.

तर वाशीम, अकोला व बुलडाणा जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता अकोला, वाशीम व अमरावती जिल्ह्यांत ५४ ते ५९ टक्के, तर बुलडाणा जिल्ह्यात ६३ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता ३१ ते ३५ टक्के राहील. अमरावती जिल्ह्यात वाऱ्याचा ताशी वेग १३ कि.मी. व उर्वरित जिल्ह्यांत १७ ते १९ कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा आग्नेयेकडून राहील.

Cold Weather
Maharashtra Rain : चार जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट; राज्यातील अनेक भागात ढगाळ हवामानाचा अंदाज

मध्य विदर्भ :
कमाल तापमान वर्धा जिल्ह्यात २९ अंश सेल्सिअस, तर यवतमाळ व नागपूर जिल्ह्यांत २८ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सर्वच जिल्ह्यांत १९ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील.

सकाळची सापेक्ष आर्द्रता यवतमाळ, नागपूर व वर्धा जिल्ह्यांत ५६ ते ६० टक्के राहील. सर्वच जिल्ह्यांत दुपारची सापेक्ष आर्द्रता ३४ ते ३८ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग सर्वच जिल्ह्यांत १० ते ११ कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा आग्नेयेकडून राहील.

पूर्व विदर्भ :
चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा व गोंदिया या जिल्ह्यांत कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस, तर किमान तापमान १९ अंश सेल्सिअस राहील. वाऱ्याचा ताशी वेग ४ ते ६ किमी राहील. सर्वच जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ६३ ते ६९ टक्के राहील.

दुपारची सापेक्ष आर्द्रता गडचिरोली व गोंदिया जिल्ह्यांत केवळ ३२ टक्के राहील. तर चंद्रपूर व भंडारा जिल्ह्यांत दुपारची सापेक्ष आर्द्रता ३८ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ३ ते ७ कि.मी. इतका राहील. वाऱ्याची दिशा सर्वच जिल्ह्यांत आग्नेयेकडून राहील. पावसाची शक्यता नाही.

पश्‍चिम महाराष्ट्र :
कमाल तापमान नगर जिल्ह्यात २७ अंश सेल्सिअस तर सांगली, कोल्हापूर व सातारा जिल्ह्यांत २८ अंश सेल्सिअस राहील. सोलापूर व पुणे जिल्ह्यांत कमाल तापमान २९ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सांगली, सोलापूर व पुणे जिल्ह्यांत १७ अंश सेल्सिअस, तर सातारा व नगर जिल्ह्यांत १८ अंश सेल्सिअस आणि कोल्हापूर जिल्ह्यात १९ अंश सेल्सिअस राहील. सर्वच जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहील.

सकाळची सापेक्ष आर्द्रता पुणे व नगर जिल्ह्यांत ६६ टक्के, सोलापूर जिल्ह्यात ७५ टक्के, तर सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांत ८० ते ८६ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता पुणे जिल्ह्यात ६० टक्के, सोलापूर व सांगली जिल्ह्यांत ५२ ते ५६ टक्के, तर सातारा व कोल्हापूर जिल्ह्यांत ४७ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग कोल्हापूर व सातारा जिल्ह्यांत १३ कि.मी., तर उर्वरित जिल्ह्यांत १७ ते १८ कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा आग्नेयेकडून राहील.

कृषी सल्ला :
१) कलिंगड व खरबूज लागवडीसाठी जमिनीची पूर्वमशागत करावी.
२) उन्हाळी भुईमुगाची पेरणी १५ जानेवारीनंतर करावी.
३) आंबा मोहरावरील तुडतुडे किडीचे नियंत्रण करावे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com