आजही ढगाळ हवामानाचा अंदाज 
हवामान

Maharashtra Rain : राज्यात दोन दिवस पावसाचा येलो अलर्ट; अनेक भागात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज

IMD Alert : हवामान विभागाने आज राज्यातील अनेक जिल्ह्यांना वारे, विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज दिला.

Anil Jadhao 

Weather Report : हवामान विभागाने आज राज्यातील अनेक भागात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज दिला. तर काही भागात ढगाळ वातावरणही राहील, असा अंदाज आहे.

 

हवामान विभागाने आज राज्यातील अनेक जिल्ह्यांना वारे, विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज दिला. कोकणातील सिंधुदूर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर आणि ठाणे जिल्ह्यात विजा आणि ढगांच्या गडगडासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज व्यक्त केला. तर मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, नगर आणि नाशिक जिल्ह्यातही विजांसह हलक्या ते मध्यम पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला.

मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि धाराशिक तसेच खानदेशातील नंदूरबार आणि धुळे तर विदर्भातील बुलडाणा, अकोला, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांना विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला.

तसेच राज्यातील इतर जिल्ह्यांमध्येही काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज दिला. उद्याही राज्यातील बहुतांशी भागात काही ठिकाणी चांगल्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. तर नाशिक, धुळे, नंदूरबार, जळगाव आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT