Maharashtra Rain Agrowon
हवामान

Maharashtra Rain : उद्या आणि परवा पाच जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट; सकाळी वातावरणाचा गारवा वाढला

Weather Report : राज्यातील काही भागात पावसाळी वातावरण आहे. पण जोरदार पावसाची नोंद नाही.

अनिल जाधव

IMD Report : राज्यात सध्या सकाळी वातावरणात गारवा जाणवत असून दुपारी उन्हाचा चटका जाणवत आहे. तर राज्यातील काही भागात पावसाळी वातावरण आहे. पण जोरदार पावसाची नोंद नाही. हवामान विभागाने आजही काही ठिकाणी पावसाची शक्यता व्यक्त केली.

राज्यात कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली. हवामान विभागाने आज कोकणातील सिंधुदूर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाचा येलो अलर्ट दिला. तसेच यावेळी ३० ते ४० किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे. कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातही काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाचा अंदाज व्यक्त केला

उद्या कोकणातील सिंधुदूर्ग, रत्नागिरी तर पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा आणि सांगली जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाचा येलो अलर्ट दिला. तर गुरुवारीही या पाच जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाचा येलो अलर्ट दिला. तर शुक्रवारी आणि शनिवारीही काही भागात हलक्या पावसाचा अंदाज दिला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Drought Relief: शेतकऱ्यांच्या खात्यात ५ हजार जमा होण्यास सुरुवात, जयकुमार गोरेंची माहिती

Nagpur Agriculture : नागपुरात कृषी विभागाचा कारभार रामभरोसे; पदे रिक्त असल्याने योजनांच्या अंमलबजावणीला ब्रेक!

Karjmafi Glitches : शेतकऱ्यांची कोंडी: सरकारच्या तांत्रिक चक्रव्यूहात अखेरची कर्जमुक्ती योजना अडकली!

November Rain: नोव्हेंबरमध्ये एमजेओमुळे पावसाचे प्रमाण वाढणार आहे का ?

Scheme Glitches : सातारा जिल्ह्यात शासकीय योजनांच्या त्रुटींचा जाच; लाभाऐवजी शेतकऱ्यांनाच सहन करावा लागतोय मनस्ताप!

SCROLL FOR NEXT