Rain Agrowon
हवामान

Paus Andaj: विदर्भात पावसाचा तीन दिवस येलो अलर्ट; मराठवड्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज

Weather Update : राज्याच्या काही भागात रविवारपासून तीन दिवस पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला.

Anil Jadhao 

Pune News : राज्याच्या काही भागात रविवारपासून तीन दिवस पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. संपूर्ण विदर्भ आणि मराठवड्यातील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला. 

हवामान विभागाने विदर्भ आणि मराठवड्यातील काही भागात पावसाचा अंदाज दिला. मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यात रविवार, सोमवार आणि मंगळवर आणि नांदेड जिल्ह्यात रविवार आणि सोमवारी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला.

यावेळी ३० ते ४० किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहण्याचाही अंदाज असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. परभणी जिल्ह्यात रविवारी, सोमवारी आणि मंगळवारी तर लातूर जिल्ह्यात रविवारी आणि मंगळवारी आणि धाराशिव जिल्ह्यात मंगळवारी ढगांच्या गडगडाटास काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे. 

संपूर्ण विदर्भात आजपासून पुढच्या पाच दिवस काही ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. बुलडाणा, अकोला, अमरावती, अकोला, वाशीम, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गोंदीया आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये रविवार, सोमवार आणि मंगळवारी काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने वर्तविला.

तसेच सोमवारी आणि मंगळवारी विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी ३० ते ४० किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहतील, असाही अंदाज हवामान विभागाने दिला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT