Monsoon Agrowon
हवामान

Monsoon Rain : बहुतांशी भागाला पावसाचा येलो अलर्ट; कोकण आणि विदर्भात अनेक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज

Weather Update : पुढील ४ दिवस राज्याच्या विविध भागात हलक्या ते मध्यम सरी पडतील, असाही अंदाज हवामान विभागाने दिला.

Anil Jadhao 

Pune News : माॅन्सूनने आज देशाच्या आणखी काही भागात प्रगती केली. आता माॅन्सूनने देशाचा बहुतांशी भाग व्यापला. तर राज्यातील अनेक ठिकाणी पावसाची हजेरी सुरुच आहे. पुढील ४ दिवस राज्याच्या विविध भागात हलक्या ते मध्यम सरी पडतील, असाही अंदाज हवामान विभागाने दिला. 

राज्यात अनेक ठिकाणी पावसाची हलक्या ते मध्यम स्वरुपाची हजेरी दिसत आहे. हवामान विभागाने आज कोकणात अनेक ठिकाणी जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला. तर मध्य महाराष्ट्रातील सातारा आणि पुणे तसेच संपूर्ण विदर्भ आणि खानदेश तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, नांदेड, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यात ठिकठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा येलो अलर्ट दिला. इतर भागातही हलक्या सरी पडतील, असाही अंदाज हवामान विभागाने दिला.

उद्या कोकण तसेच पुणे सातारा, विदर्भातील अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा आणि भंडारा जिल्ह्यात ठिकठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा येलो अलर्ट दिला. तर राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी पडतील, असाही अंदाज दिला. तसेच पुढील तीन दिवस कोकण आणि विदर्भातील काही भागात पावसाचा जोर अधिक राहण्याची शक्यता आहे. तर राज्याच्या इतर भागात हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. 

माॅन्सूनने आज देशाच्या अनेक भागात प्रगती केली. माॅन्सूनने आज संपुर्ण गुजरात आणि अरबी समुद्र व्यापला. तर मध्य प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, जम्मू, काश्मीर, लडाख, गिरगीट, बाल्टीस्तान, मुझफ्फराबादचा बहुतांशी भाग व्यापला. तर राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहारचा आणखी काही भाग व्यापला. माॅन्सूनची सिमा बारमेर, जयपूर, आग्रा, बांदा, सिध्दी, चैबासा, हलदीया, पाकूर, पटना, महाराजगंज, देहरादून, उना, पठाणकोट आणि जम्मू या भागात होती. 

माॅन्सूनच्या प्रवासासाठी पोषक हवामान असून पुढील २ ते ३ दिवसांमध्ये माॅन्सून राजस्थान, हरियाना, पंजाबच्या आणखी काही भागात दाखल होईल. तसेच मध्यम प्रदेश, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, झारखंड, बिहार, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि जम्मूचा उर्वरित भाग व्यापेल, असाही अंदाज हवामान विभागाने दिला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pest Outbreak: हवामान बदलामुळे वाढला विषारी सुरवंटांचा प्रादुर्भाव

Indigenous Cattle Breeding: शाश्‍वत शेतीसाठी देशी गोवंश संवर्धन

Sharad Pawar Meets PM Modi: शरद पवार, सुप्रिया सुळेंनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट, अचानक भेटीमुळे राजकीय वतुर्ळात चर्चा, नेमकं कारण काय?

Modern Fruit Plantation: फळझाडे लागवडीसाठी आधुनिक यंत्रे

Agriculture Machinery: जुन्या रिक्षा इंजिनापासून बहुउपयोगी कृषी यंत्र

SCROLL FOR NEXT