Rain Alert Agrowon
हवामान

Rain Alert Maharashtra : विदर्भ, मराठवाड्यात विजांसह पावसाची शक्यता

Weather Forecast : राज्यात पुन्हा पावसाची उघडीप पाहायला मिळत असल्याने उन्हाचा चटका आणि उकाडा कायम आहे. उन्हाच्या झळा वाढल्याने दुपारच्या वेळी घराबाहेर पडणे तापदायक ठरत आहे.

अमोल कुटे

Pune News : राज्यात पुन्हा पावसाची उघडीप पाहायला मिळत असल्याने उन्हाचा चटका आणि उकाडा कायम आहे. उन्हाच्या झळा वाढल्याने दुपारच्या वेळी घराबाहेर पडणे तापदायक ठरत आहे.

आज (ता. ११) मराठवाडा आणि विदर्भात विजांसह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे. तर उर्वरित राज्यात मुख्यतः उघडिपीसह ऊन - सावल्यांच्या खेळात हलक्या पावसाची शक्यता आहे.

मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा फरिदकोट पासून, लुधियाना, नजीबाबाद, शाहजहानपूर, बालिया, जलपैगुडी ते अरुणाचल प्रदेशपर्यंत सक्रिय आहे. अरबी समुद्रात गुजरातच्या किनाऱ्यालगत समुद्र सपाटीपासून ३.१ किलोमीटर उंचीवर, तसेच कर्नाटक आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून ४.५ ते ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. बंगालच्या उपसागरात बुधवारपर्यंत (ता. १३) हवेचे कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत.

राज्यात तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी पडत असल्या तरी अनेक ठिकाणी पावसाची उघडीप असल्याचे चित्र आहे. रविवारी (ता. १०) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात हलक्या ते मध्यम पावसाने हजेरी लावली.

पावसाची दडी असलेल्या भागात कमाल तापमानात वाढ झाल्याने उन्हाचा चटका, उकाडा वाढलेला आहे. उत्तर महाराष्ट्रातील धुळे आणि चंद्रपूर येथे राज्यातील उच्चांकी ३३ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले.

आज (ता. ११) सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांत विजांसह पावसाच्या सरींची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) आहे.

उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात विजांसह पावसाची शक्यता आहे. तर उर्वरित राज्यात पावसाच्या उघडिपीसह उन्हाचा चटका, उकाडा कायम राहून तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

रविवारी (ता. १०) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :

‎ठिकाणे---तापमान कमाल---तापमान किमान

‎पुणे---२९.२---२१.०

अहिल्यानगर---२६.०---२२.३

‎‎धुळे---३३.०---२१.०

जळगाव---३१.५---२४.०

जेऊर---३०.५---१९.५

‎‎कोल्हापूर---२७.८---२२.८

‎महाबळेश्‍वर---२०.५---१६.७

मालेगाव---३०.२---२२.२

‎‎नाशिक---३०.३---२२.४

‎निफाड---३०.५---२२.३

‎सांगली---२९.४---२२.०

‎सातारा---३०.६---२२.०

‎सोलापूर---२९.५---२२.४

‎सांताक्रूझ---३१.७---२५.४

डहाणू---३१.४---२४.३

‎रत्नागिरी---३०.३---२४.६

‎छत्रपती संभाजीनगर---२७.६---२०.५

‎धाराशिव---२८.८---१९.७

‎परभणी---२८.७---२३.१

परभणी (कृषी)---२८.०---२२.२

‎‎अकोला---२९.४---२४.६

अमरावती---२८.२---२३.३

भंडारा---३१.६---२३.०

बुलडाणा---२५.६---२१.८

‎ब्रह्मपुरी---३२.९---२४.२

‎चंद्रपूर---३३.०---२४.६

‎गडचिरोली---२९.४---२४.४

‎गोंदिया---३१.६---२४.२

‎नागपूर---३०.८---२३.५

‎वर्धा---३१.०---२४.९

‎वाशीम---२५.६---२१.८

विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट)

सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.

विजांसह पावसाचा अंदाज :

नंदूरबार, धुळे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Growth: महाराष्ट्राच्या शेतीची अतिवृष्टीने वाताहत ; विकास दर ५.७ टक्क्यांनी घसरला

Agrowon Podcast: सोयाबीन आज स्थिर, कापूस भाव कमीच, हरभरा दबावात, वांग्याला उठाव, कारले टिकून

Maize Price: मक्याला एक हजार हमीभाव फरक द्या, अब्दुल सत्तार यांची विधानसभेत मागणी

Weather Update: राज्यात उन्हाचा चटका वाढला; कोकणात उष्ण आणि दमट हवामानाचा अंदाज कायम

Nana Patole statement : 'सरकारने 'बनिया' वृत्ती सोडावी'; सोयाबीन, कापूस, पिकविमा आणि पीएम किसानवरून नाना पटोलेंची सरकारवर टिका

SCROLL FOR NEXT