
Chh. Sambhajinagar News : मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना व बीड या तीन जिल्ह्यांपैकी बीड व जालना जिल्ह्यात शनिवारी (ता. ९) सकाळपर्यंतच्या २४ तासात पावसाचा जोर अधिक होता.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मात्र पावसाचा लहरीपणा अधिक अनुभवला गेला. बीड व जालना जिल्ह्यातही काही ठिकाणी या लहरीपणाचा परिचय देणाऱ्या पावसाने दांडी मारली.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील छत्रपती संभाजीनगर तालुक्यात सरासरी ५.४ मिलिमीटर, पैठणमध्ये ३.७, गंगापूर १.९, वैजापूर १.५ कन्नड ११.९, खुलताबाद ३.२ , सिल्लोड ०.५, सोयगाव ०.९, फुलंब्री तालुक्यात सरासरी ११.१ मिलीमीटर पाऊस झाला. बीड जिल्ह्यातील बीड तालुक्यात सरासरी ३७.२ मिलीमीटर, पाटोदा ४.५,आष्टी १४.१, गेवराई ३.८,माजलगाव १८.२, अंबाजोगाई ०.३, केज १२, परळी ४.४, धारूर १९.५, वडवणी ११, शिरूर कासार ७.१ मिलीमीटर पाऊस झाला.
जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात सरासरी ५.६ मिलिमीटर जाफराबादमध्ये ७.८, जालन्यात २५.२, अंबड ९.८, परतुरमध्ये ४४.२, बदनापूरमध्ये ५.९, घनसावंगीत २४.६ तर मंठ्यात सरासरी २७ मिलिमीटर पाऊस झाला.
जिल्ह्यातील परतुर, मंठा, घनसावंगी व जालना तालुक्यात पावसाचा जोर अधिक होता. शनिवारी (ता. ९) अंबड शहरासह परिसरात भल्या पहाटे पासुन पावसाची रिमझिम सूरू होती. घनसावंगीत पहाटे पाच वाजेपासून सात वाजेपर्यंत जोरदार पाऊस त्यानंतर सध्या परिस्थितीपर्यंत रिमझिम पाऊस सुरू होता. .
मंडलनिहाय पाऊस (मिमी)
बीड जिल्हा
बीड ५५.५, पाली ३६.५,म्हालसा जवळा ३१.५, नाळवंडी ४६.३, राजुरी नवगन ५५.५, पिंपळनेर १९, पेंडगाव ४७.५, मांजरसुंभा २८.३, चौसाळा १६.८, नेकनूर ५७.५, लिंबागणेश १, दौला वडगाव ३८.५, धामणगाव १२.५ पिंपळा ४१.८, पाचेगाव १९.८, माजलगाव २१.५, गंगामसला ११, किट्टीआडगाव २५.३, तालखेड ११.५, नीतृड २६.८, दिंद्रुड १३.३, हनुमंत पिंपरी १२, विडा २९.५, नांदूर घाट २८.३, सिरसाळा १८.५, मोहखेड २६.८, तेलगाव २६.८, वडवणी ११, कौडगाव ११, शिरूर कासार १०, रायमोहा ११.
जालना जिल्हा
हसनाबाद १९.३, शेवली २५.३, विरेगाव ३९.५, रामनगर ३९.५, पाचन वडगाव ३९.५, अंबड १०.३ धनगर पिंपरी २२.८, रोहिलागड २६, परतूर ५८.५, वाटूर ४७.३, आष्टी ३०, श्रीष्टी ४५.५, सातोना ३९.५, दाभडी १९.३, घनसावंगी ११, राणी उचेगाव २८.३, तीर्थपुरी ११, कुंभार पिंपळगाव ११, अंतरवली टेंभी ११, रांजणी ५८.८, जाम समर्थ ४०.८, मंठा ४७.३, तळणी २०.३, भोकसाळ १३.३.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.