Weather Agrowon
हवामान

Maharashtra Rain: विदर्भातील ३ जिल्ह्यांना येलो अलर्ट; राज्याच्या इतर भागात हवामान कसे राहील?

Weather Update : राज्यातील काही भागात सकाळी थंडी वाढली आहे. काही भागात आजही पावसाचा अंदाज आहे.

Anil Jadhao 

Pune News : उत्तर भारतात किमान तापमानातील चढ उतार सुरुच आहेत. तर राज्यातील काही भागात सकाळी थंडी वाढली आहे. काही भागात आजही पावसाचा अंदाज आहे.

हवामान विभागाने आज विदर्भातील तीन जिल्ह्यांना हलक्या पावसाचा येलो अलर्ट दिला. विदर्भातील काही ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. भंडारा, गोंदीया, चंद्रपूर आणि नागपूर या चार जिल्ह्यांना हवामान विभागाने हलक्या पावसाचा येलो अलर्ट दिला.

या चारही जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगाडाटासह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. तर राज्याच्या इतर भागात हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे. 

उत्तर भारतातील काही भागात थंडीची लाट कायम आहे. पंजाब, हरियाना, पश्चिम उत्तर प्रदेश आणि उत्तर राजस्थानच्या बहुतांशी किमान तापमान ८ अंश सेल्सिअस ते १२ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते.

तर पंजाबमधील अमृतसर येथे देशातील सर्वात कमी ५.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. तर आग्नेय उत्तर प्रदेश आणि पूर्व मध्य प्रदेशातील काही ठिकाणी गारपीट झाली होती. तर देशात काही ठिकाणी हलका पाऊसही झाला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tiger Death : बरडकिन्हीमध्ये आढळला वाघाचा मृतदेह

Borewell Crackdown : बोअरवेल खोदण्यापूर्वीच प्रशासनाचा दणका

Adinath Sugar Factory : ‘आदिनाथ’ची ४५० कोटींची मालमत्ता १२२ कोटींना विकल्याचा आरोप

Panchnama Update : सोलापुरात ३५ टक्के दुष्काळी क्षेत्राचे पंचनामे पूर्ण

Ration Card e-KYC: रेशन कार्डधारकांच्या सवलतीवर गदा

SCROLL FOR NEXT