Climate Change : तापमानातील बदलाचा पीक उत्पादनावर परिणाम

Agriculture Climate : हवामान बदलानुसार प्रत्येक वर्षातील रब्बी हंगामाच्या कालावधी कमी किंवा जास्त होतो.
Climate Change
Climate ChangeAgrowon
Published on
Updated on

माणिकराव खुळे

Climate Changes Affects Crop Production : साधारण या वर्षातील थंडी, अवकाळी पाऊस, दुपारच्या कमाल तापमानाच्या बदलानुसार रब्बी हंगामाचा १०० ते १२० दिवसांच्या कालावधी १० दिवसांपासून २५ दिवसांपर्यंत मागे-पुढे सरकतो. म्हणजेच रब्बी हंगामाचे दिवस कमी-जास्त होणे, किंवा पेरणी व काढणी लवकर उशिरा होणे, हे सर्व त्या वर्षातील एल निनो, ला निना आणि एन्सो तटस्थेनुसार मागे-पुढे सरकतात. हवामान बदलानुसार प्रत्येक वर्षातील रब्बी हंगामाच्या कालावधी कमी किंवा जास्त होतो.

फेब्रुवारीच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत रब्बी पिके हुरडा अवस्थेत असतात. त्यानंतर दाण्यातील चिकाचे प्रमाण कमी होऊन दाणा टणकतेकडे रूपांतरित होत जातो आणि पीक पक्व अवस्थेत काढणीसाठी तयार होते.

या काळात पिकामध्ये शाखीय बदल जाणवू लागतात. पिकांचे प्रकाश संश्लेषण कार्य आणि अन्नद्रव्य पुरवठा कार्य मंदावते. अन्नद्रव्यासाठी हरितद्रव्याची गरज संपत आलेली असते. म्हणूनच पानातील हिरवेपणा नाहीसा होत जातो. पिकाची हिरवी पाने पिवळी होऊन गळू लागतात. निसर्गही पीक उभे असलेल्या मातीचे तापमान वाढवून, जमीन ओलावा कमी करत असतो.

म्हणजेच नकळत पिकाच्या काढणीच्या तयारीस शेतकऱ्यांना तो मदत करत असतो. म्हणूनच पेरणी अशा कालावधीत करतात, की जेव्हा पीक परतणीचा काळ हा वेगवान कमाल तापमान वाढीच्या कालावधीशी साधारणपणे जुळतो. म्हणून तर तज्ञ शेतकऱ्यांना पेरणीचा कालावधी माहीत असतो. परंतु हवामानाने गणित बिघडले की, पुढे पीक लागवड, काढणी आणि विक्रीसंबंधीच्या सर्वच विसंगती तयार होतात आणि शेतकऱ्यांचे नुकसान होते.

Climate Change
Climate Change : ‘एल निनो’ काळामध्ये हवामानातील बदल

सध्या कमाल व किमान तापमानात सरासरी साधारण दीड ते दोन अंश सेल्सिअसने वाढ होत आहे. दक्षिण अर्ध महाराष्ट्रावरील १८ अंश सेल्सिअस तापमान, दरम्यानच्या अक्षवृत्तावरील दोन्ही कमाल व किमान तापमान ही सध्या उर्वरित उत्तर महाराष्ट्राच्या म्हणजे २० ते २२ अंश अक्षवृत्ताकडे सरकत आहे. त्यामुळे उभ्या असलेल्या पिकांवर परिणाम जाणवू लागला आहे.

२०२४ च्या पूर्वार्धात शेवटच्या टप्प्यात तीव्र होऊन रेंगाळणाऱ्या एल निनोमुळे महाराष्ट्रातून थंडी लवकर गेली. त्याचा या वर्षीच्या रब्बी पिकांवर परिणाम जाणवणार आहे. हुरड्यावर आलेली सध्याची पिके एकाकी ओढू येऊन अपेक्षेपेक्षा लवकरच काढणीस येतील.

मात्र एल निनोच्या वर्षामध्ये आगाप ज्वारी, हरभरा व गहू पिकांसाठी या वर्षीचे सध्याचे वातावरण योग्य असून आगाप पिकांवर थंडी लवकर नाहीशी होण्याचा विशेष असा कोणताही नकारात्मक परिणाम जाणवणार नाही. अशा पिकांची वाढ पूर्ण होऊन वेळेत काढणी होईल.

याशिवाय पिकांच्या उत्पन्नाला मागील वर्षातील अल्प पुरवठा काळातील चालत आलेला, चांगला वाढीव बाजारभाव मिळण्याची शक्यता आहे. परंतु मागास कांदा लागवड, मागास गहू पेरणी केलेल्या पिकास हे वातावरण मारक ठरू शकते. काही भागात परिणाम होऊन उतारा कमी मिळण्याची शक्यता आहे.

Climate Change
Climate Change : २०२३ वर्ष ठरलं सर्वाधिक 'ताप'दायक

मध्य महाराष्ट्रावर परिणाम

उत्तर मध्य महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक आणि मराठवाड्यातील उत्तर छत्रपती संभाजी नगर या जिल्ह्यात पहाटेचे किमान तापमान हे सरासरीपेक्षा अधिक जाणवण्याची शक्यता आहे. या जिल्ह्यात दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात जो काही सरासरी इतका पहाटेचा गारवा जाणवत असे त्या ऐवजी अधिक उबदारपणा जाणवेल.

म्हणजे थंडी तर लवकर गेली आहे. त्याऐवजी त्या ठिकाणी या काळात अधिकची उष्णता जाणवण्यास लवकरच सुरवात होईल. मात्र उर्वरित दक्षिण मध्य महाराष्ट्रातील नगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर जिल्ह्यांत फेब्रुवारीतील पहाटेचे किमान तापमान सरासरी इतकेच जाणवेल.

येणाऱ्या पीक काढणीच्या काळात शेतकऱ्यांना अशी सूचना करावीशी वाटते, की फेब्रुवारी आणि मार्च महिना गारपीट, अवकाळी पावसाचा असतो. या दोन महिन्यांतील मासिक अंदाजही वर्तविले आहेत. महाराष्ट्रातील पावसासंबंधीच्या अवस्था त्यावेळी अंदाजामध्ये सांगितले जातील. परंतु या महिन्यातील पीक काढणीचा निर्णय करताना शेतकऱ्यांनी हवामान सूचनांकडे अवश्य लक्ष द्यावे.

माणिकराव खुळे,९४२२०५९०६२

(ज्येष्ठ हवामान तज्ञ (सेवानिवृत्त), भारतीय हवामान खाते, पुणे)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com