Climate Change  Agroowon
हवामान

Climate Change : पुढील तीन महिन्यात जगभरात तापमान वाढणार; जागतिक हवामानशास्त्र संघटनेने व्यक्त केली चिंता

Monsoon Rain : जगभरात दिवसेंदिवस तापमान वाढीची समस्या गंभीर होऊ लागली आहे. वाढत्या उष्णतेमुळे शेती पिकांसह मानवी आरोग्यावर परिणाम होऊ लागला आहे. तर दिवसेंदिवस तापमान वाढीचे उच्चांकही नोंदवले जात आहेत. त्यामुळे पावसाच्या वितरणात असमतोल दिसू लागला आहे.

Dhananjay Sanap

Heat Wave In World : मे ते जुलै २०२५ दरम्यान जगाच्या बहुतांश भागात उष्णतेचा पारा चढू शकतो, असा अंदाज जागतिक हवामानशास्त्र संघटनेनं व्यक्त केला आहे. तसेच अरब आणि पूर्व आशिया, उत्तर दक्षिण प्रशांत भागातही उष्णता उच्चांक गाठण्याची शक्यता आहे.

जगभरात दिवसेंदिवस तापमान वाढीची समस्या गंभीर होऊ लागली आहे. वाढत्या उष्णतेमुळे शेती पिकांसह मानवी आरोग्यावर परिणाम होऊ लागला आहे. तर दिवसेंदिवस तापमान वाढीचे उच्चांकही नोंदवले जात आहेत. त्यामुळे पावसाच्या वितरणात असमतोल दिसू लागला आहे. 

भारतावर परिणाम? 

जागतिक हवामानशास्त्र संघटनेनं भारताच्या काही भागात मे ते जुलै दरम्यान उष्णतेच्या झळा तापदायक ठरण्याचा अंदाज वर्तवला आहे. तसेच पावसाच्या पॅटर्नमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. या तीन महिन्यात सामान्यपेक्षा अधिक पावसाची शक्यता वर्तवली आहे. 

पार्श्वभूमी काय? 

जानेवारी ते मार्क २०२५ दरम्यान जगाच्या बहुतेक भागांमध्ये समुद्र तापमान सामान्यपेक्षा अधिक नोंदवलं गेलं. तसेच समुद्राच्या पृष्ठभागावरील तापमान सामान्यपेक्षा अधिक राहिलं. तर मध्य प्रशांत महासागरात काही भागांमध्ये तापमान सामान्य होते. त्यामुळे तिथं उष्णतेचा प्रभाव कमी होता. परंतु प्रशांत महासागराच्या पूर्वीच्या भागांमध्ये आणि मध्यभागात मात्र समुद्राच्या पृष्ठभागाचं तापमान सामान्यपेक्षा अधिक राहिलं.

तर मध्य प्रशांत क्षेत्रात तापमान सामान्य होतं. तर नोव्हेंबर २०२४ ते जानेवारी २०२५ दरम्यान मध्य व पूर्व प्रशांत महासागर वगळता जगाच्या बहुतांश भागात पृष्ठभागाचं तापमान सामान्यापेक्षा अधिक होतं.

बहुतांश महासागरांतील पृष्ठभागात तापमान सामान्यपेक्षा जास्त राहू शकतं, असा जागतिक हवामान विज्ञान संघटनेनं इशारा दिला आहे. परंतु प्रशांत महासागराच्या काही भागात स्थिती वेगळी असू शकते. त्यामुळे सामान्यत: बहुतांश भागात उष्णतेच्या झळा तीव्र असू शकतात.

तसेच उत्तर आफ्रिका, मादागास्कर, आशिया (भारतीय उपमहाद्वीप वगळता) दक्षिण अमेरिका, कॅरेबियन, मध्य अमेरिका, उत्तर अमेरिका, ऑस्ट्रेलिया, न्यूजीलंड आणि युरोपमध्ये सामान्यपेक्षा जास्त तापमानाची नोंद होऊ शकते.

तर अरब देशांपासून पूर्वीच्या आशियापर्यंत, आणि समुद्राच्या द्वीपवर्ती भागांपासून उत्तर आणि दक्षिण प्रशांत महासागरापर्यंत काही भागांमध्ये तापमान सामान्यापेक्षा खूप जास्त राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे या भागांमध्ये तीव्र उष्णता होण्याची चिंता आहे.  

दरम्यान, भारतात उष्णतेची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागानेही वर्तवली आहे. परंतु जागतिक हवामान विज्ञान संघटनेनं भारत दक्षिण आफ्रिका, दक्षिण अमेरिकेच्या काही भागात तापमान सामान्यापेक्षा अधिक राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. मात्र उष्णतेची तीव्रता अधिक नसेल, असंही जागतिक हवामानशास्त्र संघटनेनं स्पष्ट केलं आहे.  

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Marathwada Rain Update : मराठवाड्यातील तीन जिल्ह्यांत पावसाची मध्यम ते दमदार हजेरी

Book Review: अर्थवेचक गोष्टगुंफण

Darwin Theory: ‘डार्विन उत्क्रांती’ सिद्धांताच्या निमित्ताने...

Interview with Dr. Suhas Diwase: राज्यातील जमीन मोजणी जलद आणि पारदर्शक होणार

Indigenous Lifestyle: आदिवासींची निसर्गपूरक शेती अन् जीवनशैली

SCROLL FOR NEXT