Winter Update Agrowon
हवामान

Maharashtra Winter Forecast : उत्तर महाराष्ट्रात गारठा वाढला

Maharashtra Winter Weather Update : राज्याच्या किमान तापमानात घट होत असल्याने थंडीची चाहूल लागली आहे. उत्तर महाराष्ट्रात पारा १५ अंशांच्या खाली घसरल्याने गारठा वाढला आहे.

अमोल कुटे

Pune News : राज्याच्या किमान तापमानात घट होत असल्याने थंडीची चाहूल लागली आहे. उत्तर महाराष्ट्रात पारा १५ अंशांच्या खाली घसरल्याने गारठा वाढला आहे. निफाड येथील गहू संशोधन केंद्र व धुळे येथील कृषी महाविद्यालयात राज्यातील नीचांकी १३.७ अंश तापमानाची नोंद झाली. कमाल तापमानातील वाढ कायम असल्याने सांताक्रूझ येथे उच्चांकी ३६.३ अंश तापमान नोंदले गेले.

नैॡत्य बंगालच्या उपसागरात चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. मनारच्या आखातापासून पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. विदर्भ, कोकणासह महाराष्ट्राच्या दक्षिणेकडील जिल्ह्यात उन्हाचा चटका अधिक आहे. तर राज्याच्या उत्तरेकडील जिल्ह्यात किमान तापमानात वाढ होत आहे. राज्यात कमाल-किमान तापमानातील तफावत वाढली आहे.

गुरुवारी (ता. ७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये सांताक्रूझसह डहाणू, सोलापूर, अकोला, भंडारा येथे कमाल तापमान ३५ अंशांच्या पुढे आहे. तसेच निफाड, धुळेसह नाशिक, अहिल्यानगर येथे किमान तापमान १५ अंशांच्या खाली आले आहे. आज (ता. ८) तापमानातील चढ-उतार कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

गुरुवारी (ता. ७) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले कमाल आणि किमान तापमान (कंसात) तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३२.८ (१५.२), अहिल्यानगर ३२ (१४.७), धुळे ३३ (धुळे १३.७), जळगाव ३३.८ (१५.८), कोल्हापूर ३१.४ (१५.५), महाबळेश्वर २७.३ (१५.६), मालेगाव (१७.८), नाशिक ३२.७ (१४.४), निफाड ३०.४ (१३.७), सांगली ३२.९ (१९.३), सातारा ३२.३ (१६.६), सोलापूर ३५.३ (२१.६), सांताक्रूझ ३६.३ (२०.१), डहाणू ३५.६ (२१.८), रत्नागिरी ३४.९ (२२.३), छत्रपती संभाजीनगर ३४ (१६.५), नांदेड (१८.३), धाराशिव ३१.५ (१८.४), परभणी ३३.६ (१८.३), अकोला ३५.२ (१९.५), अमरावती ३४ (१८.३), भंडारा ३५, बुलडाणा ३१.३ (१८.०), ब्रह्मपुरी ३३.९ (१९.१), चंद्रपूर ३२.८ (१८.२), गडचिरोली ३२.४ (१८.४), गोंदिया ३१.८ (१८.२), नागपूर ३२.५ (१९.४), वर्धा ३४.४, वाशीम ३२.७ (१८.०), यवतमाळ ३२.७ (१८).

३५ अंशांपेक्षा अधिक तापमान असलेली ठिकाणे : सांताक्रूझ ३६.३, डहाणू ३५.६, सोलापूर ३५.३, अकोला ३५.२, भंडारा ३५.

१५ अंशांपेक्षा कमी तापमान असलेली ठिकाणे : निफाड १३.७, धुळे १३.७, नाशिक १४.४, अहिल्यानगर १४.७

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Avliya Avinash Success Story: विनाशकारी कोविड : अवलिया अविनाश

Tomato Bacterial Wilt: टोमॅटो पिकातील जिवाणूजन्य मर रोगावर काय उपाय करावा?

Choose Right Tree: कोणता वृक्ष आणि कुठे लावावा?

Biological Crop Disease Control: केवडा रोग कार्यरत होण्यास वाव, जैविक नियंत्रणावर हवा भर

Weather Stations: स्वयंचलित हवामान केंद्रांशी छेडछाड करणाऱ्यांवर कठोर कारवाई : मित्तल

SCROLL FOR NEXT