Weather Agrowon
हवामान

Hawaman Andaj : राज्यात थंडी वाढायला सुरुवात; राज्यातील अनेक भागात हवेतील गारवा वाढला

Weather Update : हवामान विभागाने पुढील काही दिवसांमध्ये तापमानात आणखी घट होईल, असा अंदाज व्यक्त केला.

Anil Jadhao 

Pune News : राज्याच्या अनेक भागात किमान तापमानात मोठी घट दिसून येत आहे. त्यामुळे सकाळी थंडीचा कडाका वाढताना दित आहे. हवामान विभागाने पुढील काही दिवसांमध्ये तापमानात आणखी घट होईल, असा अंदाज व्यक्त केला.

राज्याच्या किमान तापमानात घट होत असल्याने थंडीची चाहूल लागली आहे. उत्तर महाराष्ट्रात पारा १५ अंशांच्या खाली घसरल्याने गारठा वाढला आहे. निफाड येथील गहू संशोधन केंद्रात राज्यातील नीचांकी तापमानाची नोंद झाली. कमाल तापमानातील वाढ कायम असल्याने सांताक्रूझ येथे उच्चांकी ३६.१ अंश तापमान नोंदले गेले. राज्यात तापमानातील चढ-उतार सुरूच राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

नैॡत्य बंगालच्या उपसागरात चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. पुढील ३६ तासांमध्ये चक्राकार वाऱ्याच्या स्थितीचे रुपांतर कमी दाब प्रणालीत होण्याची शक्यता आहे. ही प्रणाली तमिळनाडू आणि श्रीलंकेच्या किनाऱ्याकडे येण्याचे संकेत आहेत. मनारच्या आखातापासून पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा कायम आहे. आग्नेय अरबी समुद्रात लक्षद्वीप बेटांजवळ चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे.

हवामान विभागाने पुढील ५ दिवस तमिळनाडू, पुद्दूचेरी, कराईकल आणि केरळमध्ये काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज दिला. १२ आणि १३ नोव्हेंबरला आंध्र प्रदेशातही पाऊस पडेल, अशी शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Update: कोकण, घाटमाथा, विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा अंदाज

Drought Situation: दुष्काळस्थितीत यंत्रणांनी सतर्क राहावे : कृषिमंत्री भरणे

Ghodganga AGM Controversy: ‘घोडगंगा’च्या सभेत घोषणाबाजीने गोंधळ

Illegal Water Extraction: तलाव आटले, तरीही अवैध पाणीउपसा सुरू

Farmers Protest: २३ सप्टेंबरला मंत्र्यांना काजू, बदाम पाठवून राज्यभर आंदोलन, किसान सभेची घोषणा

SCROLL FOR NEXT