Winter Season Agrowon
हवामान

Maharashtra Hawaman Andaj : राज्यात थंडीची तीव्रता कमी झाली; बहुतांशी ठिकाणी किमान तापमानात वाढ

Maharashtra Winter Season : किमान तापमानात वाढ झाल्याने थंडीची लाट काहीशी कमी झाली. मात्र राज्यातील गारठा कायम आहे. आज धुळे येथील कृषी महाविद्यालयात राज्याचे नीचांकी ८.८ अंश तापमान नोंदले गेले.

Anil Jadhao 

Pune News : किमान तापमानात वाढ झाल्याने थंडीची लाट काहीशी कमी झाली. मात्र राज्यातील गारठा कायम आहे. आज धुळे येथील कृषी महाविद्यालयात राज्याचे नीचांकी ८.८ अंश तापमान नोंदले गेले. तर निफाड येथील गहू संशोधन केंद्रात ९.५ अंश सेल्सिअस तापमान होते. पुढील दोन दिवसांत राज्याच्या किमान तापमानात २ ते ४ अंशांची वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

पश्‍चिम-मध्य बंगालच्या उपसागरात ठळक कमी दाब क्षेत्र सक्रिय आहे. उत्तर आणि ईशान्येकडे सरकताना आज या प्रणालीची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. उत्तर भारतात थंडीची लाट कायम आहे. आज पंजाबच्या ‘आदमपूर’ येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी ३.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उत्तर भारतात थंडीसोबतच धुक्याची चादर दिसून येत आहे. राज्यातही काही भागात सकाळी धुके पडत आहे.

राज्यातील किमान पातमानात काहीशी वाढ झाली. त्यामुळे थंडीची लाट कमी झाली. मात्र बहुतांशी भागात थंडी कायम आहे.तर सकाळी हवेत धुकेही जाणवत आहे. आज राज्यातील कमी ठिकाणी १० अंशांपेक्षा कमी तापमान होते. किमान तापमानासोबतच कमाल तापमानातही काही भागात वाढ दिसून आली.

आज धुळे येथील कृषी महाविद्यालयात राज्याचे नीचांकी ८.८ अंश तापमान नोंदले गेले. तर निफाड येथील गहू संशोधन केंद्रात ९.५ अंश सेल्सिअस तापमान होते. तर राज्याच्या इतर ठिकाणी तापमान १० अंशाच्या पुढे गेले आहे. पुढील दोन दिवसांत राज्याच्या किमान तापमानात २ ते ४ अंशांची वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rainfall Update: जुलै महिन्यात ३८ मंडलांत कमी पाऊस

Rural Development: सोसायट्या गावाच्या विकासाचे केंद्र बनाव्यात : मंत्री बाबासाहेब पाटील

Jeevamrut Initiatives: एकाच दिवसात ५०० लिटर जिवामृत निर्मितीचा उपक्रम

Crop Damage Compensation: काजू, आंबा उत्पादक नुकसान भरपाईपासून वंचित, पंचनाम्यांतील तांत्रिक अडचणी दूर करण्याची मागणी

Crop Insurance Scheme: बीडमध्ये २.३१ लाख शेतकऱ्यांचे पीकविमा संरक्षण

SCROLL FOR NEXT