Maharashtra Weather
Maharashtra WeatherAgrowon

Maharashtra Cold Wave : थंडीची लाट ओसरली, गारठा कायम

Maharashtra Weather Forecast : किमान तापमानात वाढ झाल्याने थंडीची लाट काहीशी ओसरली आहे. मात्र राज्यातील गारठा कायम आहे. शुक्रवारी (ता. २०) धुळे येथील कृषी महाविद्यालयात राज्याचे नीचांकी ७ अंश तापमान नोंदले गेले.
Published on

Pune News : किमान तापमानात वाढ झाल्याने थंडीची लाट काहीशी ओसरली आहे. मात्र राज्यातील गारठा कायम आहे. शुक्रवारी (ता. २०) धुळे येथील कृषी महाविद्यालयात राज्याचे नीचांकी ७ अंश तापमान नोंदले गेले. पुढील दोन दिवसांत राज्याच्या किमान तापमानात २ ते ४ अंशांची वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

पश्‍चिम-मध्य बंगालच्या उपसागरात ठळक कमी दाब क्षेत्र सक्रिय असून, उत्तर आणि ईशान्येकडे सरकताना आज (ता. २१) या प्रणालीची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीचा कडाका काहीसा कमी झाला आहे. शुक्रवारी (ता. २०) पंजाबच्या ‘आदमपूर’ येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी ३.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

Maharashtra Weather
Maharashtra Cold Wave : राज्यातील बहुंताशी भागात थंडी कायम; काही भागात किमान तापमानात वाढ

राज्यात आलेली थंडीची लाट ओसरली असून, धुळे, निफाड, जळगाव, अहिल्यानगर येथे गारठा कायम आहे. उर्वरित राज्यात किमान तापमानाचा पारा १० अंशांच्या वर सरकल्याने थंडी कमी झाली आहे. पहाटेच्या वेळी धुक्याची चादर आणि दव पडल्याचे चित्र दिसून येत आहे.

शुक्रवारी (ता. २०) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये सोलापूर येथे राज्यातील उच्चांकी ३४ अंश तापमानाची नोंद झाली. उत्तरेकडील थंड वाऱ्यांचे प्रवाह कमी झाल्याने राज्यात थंडी थोडीशी कमी झाली असली तरी गारठा टिकून आहे. आज (ता. २१) राज्याच्या किमान तापमानात वाढ होत गारठा कमी होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

Maharashtra Weather
Cold Weather : सिंधुदुर्गात गारठा वाढला; आंबा, काजू बागायतदारांना दिलासा

शुक्रवारी (ता. २०) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :

पुणे ३२.२ (१२.५), अहिल्यानगर - (९.७), धुळे ३०.५ (७), जळगाव २९.६ (९.५), जेऊर ३३ (११), कोल्हापूर ३०.१ (१७.६), महाबळेश्‍वर २७.२ (१२.२), मालेगाव २७.७ (१२.२), नाशिक ३१.२ (१०.७), निफाड २९.८ (८.४), सांगली ३१.४ (१७), सातारा ३१.७ (१४.६), सोलापूर ३४ (१७.४), सांताक्रूझ ३१.४ (१८.५), डहाणू २९.३ (१६.१), रत्नागिरी ३३.८ (१९.६), छत्रपती संभाजीनगर ३०.५ (१२.४), बीड २९ (-),

धाराशिव ३०.३ (१२.२), परभणी ३०.९ (१४.५), परभणी कृषी विद्यापीठ २९ (१२.४), अकोला ३०.३ (१२.८), अमरावती ३१.४ (१५.१), भंडारा २८ (१४), बुलडाणा ३१(१३.४), ब्रह्मपुरी ३३.६ (१३.१), चंद्रपूर २९.४ (-), गडचिरोली ३० (१५.४), गोंदिया २९.८ (१६.६), नागपूर ३०.२ (१६.१), वर्धा ३०.१ (१६.२), वाशीम २९.६ (१५), यवतमाळ ३०.५ (-).

१० अंशांपेक्षा कमी तापमान असलेली ठिकाणे :

धुळे ७, निफाड ८.४, जळगाव ९.५, अहिल्यानगर ९.७.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com