Weather  Agrowon
हवामान

Weather Update : राज्यात कोरडं हवामान राहणार की पाऊस पडणार? 

Maharashtra Weather : राज्यात पहाटची थंडी कमी झाली आहे. तसेच दुपारी उन्हाचा चटकाही काहीसा वाढला आहे. तर विदर्भात मात्र काही जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे.

Dhananjay Sanap

Weather Forecast : राज्यात पहाटची थंडी कमी झाली आहे. तसेच दुपारी उन्हाचा चटकाही काहीसा वाढला आहे. तर विदर्भात मात्र काही जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. तर उर्वरित राज्यात उन्हाच्या झळाही अनुभवायला मिळतायत.

आज विदर्भातील चार जिल्ह्यात हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागानं दिला आहे. विदर्भातील चंद्रपुर, गडचिरोली, गोंदिया आणि यवतमाळ जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे. उर्वरित राज्यात मात्र हवामान कोरडं राहिलं, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

उत्तरेत पश्चिम हिमालय भागात १७ ते २० फेब्रुवारीच्या दरम्यान हिमवर्षा आणि पावसाची शक्यता आहे. तर पंजाब, हरियाणा, पश्चिम उत्तर प्रदेश आणि उत्तर राजस्थानच्या बहुतांश भागात कमाल तापमान वाढ होण्याची शक्यता आहे.

तसेच मागील २४ तासात देशातील सर्वात कमी तापमानाची नोंद अमृतसर येथे झाली. पूर्व उत्तर प्रदेश, पूर्व मध्यप्रदेश. छत्तीसगडमध्ये विजांसह पावसाची शक्यता तर तामिळनाडू, पॉडीचेरी, कारईकल आणि केरलाच्या काही ठिकाणी विजासह हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

दरम्यान आज विदर्भातील चार जिल्ह्यात हलक्या पावसाची शक्यता आहे. तर उर्वरित राज्यात पुढील पाच दिवस कोरड्या हवामान अंदाज हवामान विभागाने दिला आहे. राज्यात अनेक भागात रब्बी हरभरा काढणी सुरू आहे. अवकाळी पावसानं शेतकऱ्यांची चिंता वाढवली आहे.    

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT