Cold Weather Agrowon
हवामान

Maharashtra Cold : राज्यातील थंडी कमी होणार? राज्यातील अनेक भागात थंडीचा कडाका कायम

Weather Update : राज्यातील किमान तापमानात पुढील काही दिवसांमध्ये पुन्हा वाढ होण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

Anil Jadhao 

Pune News : राज्यातील बहुतांशी भागांमध्ये थंडीचे प्रमाण कमी जास्त आहे. उत्तर भारतात थंडीचा कडाका कायम दिसतो. राज्यात थंडीचे प्रमाण कमी होऊन अनेक भागात तापमान वाढ होऊ शकते, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.

उत्तर भारतात मागील आठवड्यात थंडीचा कडाका चांगलाच वाढला होता. अनेक भागात किमान तापमान ४ अंश सेल्सिअस ते ८ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते. मात्र मागील काही दिवसांमध्ये काही भागात किमान तापमानात वाढ झालेली दिसते.

नैऋत्य अरबी समुद्रात समुद्र सपाटीपासून ३.१ चक्राकार वाऱ्यांची स्थिती दक्षिणेकडे सरकली आहे. पंजाब, हरियाना, चंदीगड, दिल्ली, पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये किमान तापमान सरासरी ६ अंश सेल्सिअस ते ९ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते.

तर राजस्थान, पुर्व उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, मध्य प्रदेश, उत्तर गुजरात आणि चंदीगडच्या काही भागात तापमान १० ते १४ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते. राज्याच्या किमान तापमानात चढ-उतार सुरू आहेत.

विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात गारठा कायम आहे. राज्यात अनेक भागात किमान तापमान घट झाली होती. मात्र काही भागात तापमानात वाढही दिसून आली. राज्यातील किमान तापमानात पुढील काही दिवसांमध्ये पुन्हा वाढ होण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rain Update In Maharashtra: कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील ६ जिल्ह्यांत जोरदार पावसाचा अंदाज 

Crop Insurance: पीकविमा योजनेत शेतकऱ्यांना वेळेत नुकसान भरपाई मिळेना; कृषिमंत्र्यांची कबुली

Akola Heavy Rainfall: अकोला जिल्ह्यात सर्वदूर मॉन्सून पावसाची दमदार हजेरी

Seed Ball Making: सीड बॉल निर्मितीतून पर्यावरण संवर्धनाचा संदेश

Marathwada Rain 2026: छत्रपती संभाजीनगर, जालना जिल्ह्यातील ९ मंडलांत अतिवृष्टी

SCROLL FOR NEXT