Monsoon Rain Agrowon
हवामान

Monsoon Rain : उद्यापासून पाऊस उसंत घेणार ? विदर्भ, कोकणात दोन दिवस पावसाचा अंदाज कायम

Rain Update : उद्यापासून राज्यातील अनेक उद्यापासून पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे, असा अंदा हवामान विभागाने दिला.

Anil Jadhao 

Pune News : राज्याच्या काही भागात जोरदार पाऊस पडत असला तरी अनेक ठिकाणी पावसाची नुसती भूरभूर सुरु होती. कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर जोरदार सरी पडत आहेत.  मात्र उद्यापासून राज्यातील अनेक उद्यापासून पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाने दिला. 

उद्या विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. हवामान विभागाने उद्या विदर्भात येलो अलर्ट दिला. तर कोकणातील रत्नागिरी आणि रायगड तसेच सातारा आणि पुणे जिल्ह्यातही काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला. मात्र कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी पडतील.

मराठवाड्यातील जाला, परभणी आणि नांदेड जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे. मात्र इतर जिल्ह्यांमध्ये पाऊस उसंती घेण्याची शक्यता आहे. खानदेशातही काही भागात हलक्या ते मध्यम पाऊस वगळता जोरदार पावसाची शक्यता नसल्याचेही हवामान विभागाने स्पष्ट केले. 

बुधवारी कोकणात काही ठिकाणी पावसाचा जोर हलकासा वाढण्याची शक्यता आहे, तर मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा आणि पुणे जिल्ह्यातही काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. संपूर्ण विदर्भालाही काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला. मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम सरींचा अंदाज आहे. तर खानदेशातही काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. 

गुरुवारी आणि शुक्रवारी राज्यातील अनेक भागात पावसाचा जोर आणखी ओसरण्याची शक्यता आहे. विदर्भ, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातही पाऊस उंसत घेण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाने दिला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Payments Pending: ऊस बिले द्या, अन्यथा जलसमाधि

Farmer Loan Waiver : २०१७ आणि २०१९ च्या कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी निर्णय

Drinking Water Storage: तेरा प्रकल्पांतील साठा पिण्यासाठी आरक्षित

Tur Seeds Procurement: तेलंगणातील शेतकरी तूरीच्या बियाणे खरेदीसाठी करमाळ्यात

Agrowon Podcast: आल्याचा भाव टिकून; सोयाबीन टिकून, गहू आवक घटली, तर कापूस व कारले स्थिरावले

SCROLL FOR NEXT