Rain Forecast Agrowon
हवामान

Paus Andaj : राज्यात चार दिवसांनंतर खरंच पाऊस पडणार का? कोणकोणत्या भागात पावसाची शक्यता आहे ?

Maharashtra Weather : काही भागात ढगाळ वातावरण आणि तुरळक ठिकाणी हलक्या सरीच पडू शकतात, असा अंदाज हवामान विभागाने निवृत्त शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी दिला.

Anil Jadhao 

Pune News : राज्यात सध्या उन्हाचा कडाका चांगलाच वाढत आहे. त्यातच पुढील काही दिवसांमध्ये राज्यात पावसाचा अंदाज आल्याच्या बातम्या येत आहेत. पण राज्यात मोठ्या पावसाची शक्यता नाही. काही भागात ढगाळ वातावरण आणि तुरळक ठिकाणी हलक्या सरीच पडू शकतात, असा अंदाज हवामान विभागाने निवृत्त शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी दिला. 

राज्यात १६ तारखेपासून पावसाचा अंदाज असल्याचे सांगितले जाते, याविषयी बोलताना श्री खुळे यांनी सांगितले की, आजपासून चार दिवसानंतर विदर्भातील केवळ अमरावती, नागपूर, गोंदिया आणि गडचिरोली अश्या ४ जिल्ह्यांमध्ये १६ ते १९ मार्च म्हणजेच शनिवार ते मंगळवार दरम्यान केवळ ढगाळ वातावरण राहील.

अगदीच तुरळक ठिकाणी किरकोळ अवकाळी पावसाची शक्यता दिसते.  उर्वरित कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातील इतर जिल्ह्यांमधील वातावरण कोरडेच राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे या जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांनी घाबरू नये. पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता म्हणून बातमी शेतकऱ्यांच्या कानी येऊ शकते. मात्र शेतकऱ्यांनी विचलित होऊ नये, असे आवाहनही त्यांनी केले. 

एकंदरीत सध्याच्या पीक काढणीतील महिन्यात अवकाळी वातावरण कसे असेल? याविषयी बोलताना श्री खुळे म्हणाले की, अवकाळी पाऊस व गारपीटीच्या हंगामाचा कालावधी अजूनही संपलेला नाही. परंतु खंडीत होत जाणाऱ्या पश्चिमी झंजावाताच्या साखळ्या  आणि एल- निनोचे वर्ष तसेच मार्चच्या मासिक सरासरीपेक्षा कमी पर्जन्याची शक्यता, ह्यामुळे महाराष्ट्रात अवकाळी पाऊस व गारपीटीची विशेष अशी शक्यता सध्याच्या व रब्बी पीक काढणीच्या काळात जाणवणार नाही, असा अंदाज आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

दोन दिवसानंतर तापमान वाढीचे स्वरूप कसे असु शकते? याविषय त्यांनी सांगितले की, पश्चिम झंजावाताच्या साखळ्या खंडीत होण्याच्या शक्यतेमुळे ६ महिने त्यांच्यामुळे संपूर्ण उत्तर भारतात अनुभवलेला पाऊस, हिमवृष्टी व थंडीचा कालावधी तेथे संपुष्टात येण्याची शक्यता निसर्ग कालचक्राप्रमाणे आता निर्माण होत आहे. परिणामी शुक्रवार, १५ मार्चपासून महाराष्ट्रातही थंडी कमी होवून कमाल व किमान तापमानात सरासरीपेक्षा २ अंशाने वाढ होण्याची शक्यता आहे, असेही अंदाज श्री. खुळे यांनी व्यक्त केला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT