Maharashtra Weather Agrowon
हवामान

Maharashtra Weather : उत्तर महाराष्ट्रात गारठा वाढला

Maharashtra Weather Forecast : राज्यात तापमानातील चढ-उतार सुरूच राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

अमोल कुटे

Pune News : किमान तापमानात घट होऊ लागल्याने राज्यात थंडी हळूहळू वाढत जाण्याचे संकेत आहेत. उत्तर महाराष्ट्रात किमान तापमानाचा पारा १६ अंशांच्या खाली आल्याने गारठा वाढला आहे. उर्वरित राज्यात अद्यापही थंडीची प्रतीक्षा आहे. शनिवारी (ता. ९) धुळे येथील कृषी महाविद्यालयात राज्यातील नीचांकी १३.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्यात तापमानातील चढ-उतार सुरूच राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

नैर्ऋत्य बंगालच्या उपसागरात चक्राकार वाऱ्यांच्या स्थितीमुळे या भागात आज रात्रीपर्यंत (ता. १०) कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. ही प्रणाली तमिळनाडू आणि श्रीलंकेच्या किनाऱ्याकडे येण्याचे संकेत आहेत. वरील प्रणालीपासून पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा कायम आहे. आग्नेय अरबी समुद्रात लक्षद्वीप बेटांजवळ चक्राकार वाऱ्यांची स्थिती टिकून आहे.

कोकणात उन्हाचा चटका अधिक असला तरी उर्वरित राज्यात कमाल तापमानात हळूहळू कमी होत आहे. राज्याच्या उत्तरेकडील जिल्ह्यात किमान तापमानाचा पारा घसरू लागला आहे. मध्य महाराष्ट्रात पहाटेवेळी गारठा वाढला आहे. राज्यात कमाल-किमान तापमानातील तफावत कायम आहे. राज्याच्या किमान तापमानात घट होत असली तरी थंडीची प्रतीक्षा आहे.

शनिवारी (ता. ९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये डहाणू येथे राज्यातील उच्चांकी ३६.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. सांताक्रूझ व रत्नागिरी येथे कमाल तापमान ३५ अंशांच्या पुढे आहे. तसेच मध्य महाराष्ट्रातील धुळ्यासह निफाड, नाशिक, जळगाव, अहिल्यानगर, महाबळेश्‍वर, पुणे येथे किमान तापमान १६ अंशांच्या खाली आले आहे. आज (ता. १०) तापमानातील चढ-उतार कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

शनिवारी (ता. ९) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले कमाल आणि किमान तापमान (कंसात) तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :

पुणे ३१.२ (१५.८), अहिल्यानगर ३०.९ (१५.५), धुळे - (१३.४), जळगाव - (१५.३), कोल्हापूर ३१.२ (१९.१), महाबळेश्‍वर २६ (१५.५), मालेगाव ३०.८ (१७.०), नाशिक ३१ (१४.७), निफाड ३१.३ (१३.६), सांगली ३२.२ (१८.३), सातारा - (१६.५), सोलापूर ३४.८ (२०.४), सांताक्रूझ ३५.६ (२१.२), डहाणू ३६.१ (२०.६), रत्नागिरी ३५.३ (२१), छत्रपती संभाजीनगर ३२.३ (१७), धाराशिव - (१९.८), परभणी - (१७.७), अकोला ३३.७ (२१), अमरावती ३२.८ (१९.७), बुलडाणा ३२ (१८.६), ब्रह्मपुरी ३४ (१८.५), चंद्रपूर ३२.८ (१८.४), गडचिरोली ३२.६ (१८.२), गोंदिया ३१.६ (१७), नागपूर ३१.६ (१८.५), वर्धा ३१.२ (१९), वाशीम ३४.८ (-), यवतमाळ ३१.५ (१७.५).

१६ अंशांपेक्षा कमी तापमान असलेली ठिकाणे :

धुळे १३.४, निफाड १३.६, नाशिक १४.७, जळगाव १५.३, अहिल्यानगर १५.५, महाबळेश्‍वर १५.५, पुणे १५.८.  

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Someshwar Sugar Factory: ‘सोमेश्वर’निवडणुकीत सुनेत्रा पवार पॅनेलची मुसंडी

Baramati KVK: कृषी विज्ञान केंद्र बारामतीला पुरस्कार

Madhu Kambikar Death: ज्येष्ठ अभिनेत्री मधु कांबीकर यांचे निधन

AI in Agriculture: ‘एआय’च्या मदतीने मराठवाड्यात एकरी १२५ टन ऊस

Soybean Price: अकोल्यात सोयाबीनचा सरासरी दर ६५०० रुपयांवर

SCROLL FOR NEXT