Summer Heat Agrowon
हवामान

Weather Update : ढगाळ हवामानासह उन्हाचा चटका कायम राहण्याचा अंदाज

Summer Heat : राज्यातील वादळी पाऊस आणि गारपिटीचे ढग दुर होताच सुर्य पुन्हा तळपू लागला आहे.

अमोल कुटे

Pune News : राज्यातील वादळी पाऊस आणि गारपिटीचे ढग दुर होताच सुर्य पुन्हा तळपू लागला आहे. राज्यात उन्हाचा चटका वाढणार असून, कमाल तापमानात २ ते ४ अंशांची वाढ होण्याची शक्यता आहे. आज (ता. २२) राज्यात अंशतः ढगाळ हवामानासह उन्हाची ताप कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

पश्चिम विदर्भ आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम आहे. उत्तर महाराष्ट्र ते उत्तर केरळच्या किनाऱ्याला समांतर हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.

झारखंड आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती असून, त्यापासून मेघालयापर्यंत हवेचा कमी दाब पट्टा कायम आहे. विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात ढगाळ आकाश झाल्याचे दिसून आले.

गुरूवारी (ता. २१) सकाळपर्यंतच्या २४ तासांत सोलापूर येथे राज्यातील उच्चांकी ३९.० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. कमाल आणि किमान तापमानात वाढ होऊ लागली आहे. राज्याच्या कमाल तापमानात येत्या चार दिवसांत २ ते ४ अंशांची वाढ होण्याचे संकेत आहेत. परिणामी राज्यात उन्हाचा चटका कायम आहे. वादळी पाऊस उघडीप देण्याची शक्यता आहे.

गुरूवारी (ता. २१) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे ३६.१, नगर ३५.२, धुळे ३६.०, जळगाव ३७.४, कोल्हापूर ३६.८, महाबळेश्वर ३१.२, नाशिक ३५.६, निफाड ३४.३, सांगली ३७.०, सातारा ३५.८, सोलापूर ३९.०, सांताक्रूझ ३८.७, डहाणू ३५.८, रत्नागिरी ३३.९,

छत्रपती संभाजीनगर ३५.८, नांदेड ३६.२, परभणी ३६.९, अकोला ३६.९, अमरावती ३५.२, बुलढाणा ३५.०, ब्रह्मपूरी ३५.०, चंद्रपूर ३४.८, गडचिरोली ३४.२, गोंदिया ३१.८, नागपूर ३२.६, वर्धा ३३.५, वाशीम ३८.६, यवतमाळ ३७.०.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rainfall Update: जुलै महिन्यात ३८ मंडलांत कमी पाऊस

Rural Development: सोसायट्या गावाच्या विकासाचे केंद्र बनाव्यात : मंत्री बाबासाहेब पाटील

Jeevamrut Initiatives: एकाच दिवसात ५०० लिटर जिवामृत निर्मितीचा उपक्रम

Crop Damage Compensation: काजू, आंबा उत्पादक नुकसान भरपाईपासून वंचित, पंचनाम्यांतील तांत्रिक अडचणी दूर करण्याची मागणी

Crop Insurance Scheme: बीडमध्ये २.३१ लाख शेतकऱ्यांचे पीकविमा संरक्षण

SCROLL FOR NEXT