Weather Forecast Agrowon
हवामान

Hawaman Andaj : पुढील पाच दिवस तापमान कसे राहील? उन्हाचा चटका आणखी वाढण्याचा अंदाज

Weather Prediction : राज्यात काही दिवसांपासून सकाळी गारवा आणि दुपारी उन्हाचा चटका अशी स्थिती दिसून येत आहे. तर राज्यात पुढील पाच दिवस हवामान कोरडे राहील, असाही अंदाज हवामान विभागाने दिला.

Anil Jadhao 

Pune News : देशातील काही भागात पाऊस आणि थंडी असे समिकरण दिसून येत आहे. राज्यात काही दिवसांपासून सकाळी गारवा आणि दुपारी उन्हाचा चटका अशी स्थिती दिसून येत आहे. तर राज्यात पुढील पाच दिवस हवामान कोरडे राहील, असाही अंदाज हवामान विभागाने दिला.  

अवकाळी पाऊस आणि गारपिटीच्या तडाख्यानंतर राज्याच्या किमान तापमानात अचानक घट झाली आहे. सकाळी हवेत गारवा जाणवत आहे. तर दुपारच्या वेळी उन्हाचा चटका आणि उकाडा कायम असल्याचे चित्र आहे.

अवकाळी पाऊस आणि गारपिटीच्या तडाख्यानंतर राज्याच्या किमान तापमानात अचानक घट झाली आहे. सकाळी हवेत गारवा जाणवत आहे. तर दुपारच्या वेळी उन्हाचा चटका आणि उकाडा कायम असल्याचे चित्र आहे.

पूर्व विदर्भापासून कर्नाटक ते दक्षिण तमिळनाडूपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. विदर्भ, मराठवाड्यात काही भागांमध्ये अंशतः ढगाळ हवामान होते. आज तापमानातील वाढ कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे

राज्यातील बहुतांशी भागात दुपारी किमान आणि कमाल तापमानात वाढ दिसून आली आहे. अनेक ठिकाणी कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त होते. आज सोलापूर येथे राज्यातील कमाल तापमानाची नोंद झाली.

येथे कमाल तापमान ३८.६ अंश सेल्सिअस तापमान होते. देशाच्या काही भागात पाऊस आणि बर्फवृष्टीचा अंदाज आहे. तसेच अनेक ठिकाणी किमान तापमानात घट झाली. पण राज्यात पुढील पाच दिवस हवामान कोरडे राहील, असा अंदाज हवामान विभागाने दिला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharshtra Rain Update: कोकण, मध्य महाराष्ट्रात विजांसह पावसाचा अंदाज 

Nursery Management Training: फळ रोपवाटिका व्यवस्थापनावर तीनदिवसीय प्रशिक्षण

Crop Insurance Issue: शेकटा मंडळातील पीकविमा परताव्याचा प्रश्न ऐरणीवर!

Gomutra Wapar: गोमूत्र वाया जाऊ देऊ नका; शेणखताची गुणवत्ता वाढवण्यासाठी करा वापर

Ratoon Sugarcane Management: कमी पाण्यामध्ये खोडवा उसाचे व्यवस्थापन

SCROLL FOR NEXT