Cold Weather
Cold Weather Agrowon

Hawaman Andaj : सकाळची थंडी किती दिवस जाणवेल ? सध्या थंडी जाणवण्याचे कारण काय ? राज्यातील कोणत्या भागात थंडी ?

Weather Update : सध्याची थंडी ही पश्चिमी झंजावातामुळे जाणवत आहेत, असे हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितले.
Published on

Pune News : राज्यासह देशातील काही भागात सकाळी थंडी जाणवत आहे. दुपारी उन्हाचा चटका आणि सकाळी थंडी अशी स्थिती आहे. सध्याची थंडी ही पश्चिमी झंजावातामुळे जाणवत आहेत, असे हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितले.

सध्याची थंडी कशामुळे व अजुन किती दिवस जाणवणार आहे? याविषयी सांगताना श्री. खुळे म्हणाले की, भारतीय उपखंडात ऑक्टोबर ते मार्च अश्या सहा महिन्यात पहिल्याने दुसऱ्याला 'खो' देत पाठलागात कायम सातत्य ठेवणारे पश्चिमी झंजावात भू-मध्य समुद्रावरून आर्द्रता भरून इराण, इराक, अफगाणिस्तान, पाकिस्तान, ओलांडून आपल्या देशातील जम्मू आणि काश्मीर, लेह, लडाख सिक्कीम, अरुणाचलपर्यंत आर्द्रता रिते करत जातात. त्यातून पाऊस, बर्फवृष्टी, थंडी मिळते. 

Cold Weather
Weather Update : पहाटे गारठा, दुपारी उन्हाच्या झळा

अजून पश्चिमी झंजावात साखळीचा  कालावधी संपलेला नाही. उत्तर भारतातील पश्चिमी झंजावाताची साखळी टिकून आहे. अजुनही ४ दिवसानंतर १० मार्चला एक पश्चिमी झंजावात प्रवेश करणार आहे. त्यामुळे १२ ते १४ मार्चपर्यंतही थंडी टिकून राहू शकते. 

सध्या महाराष्ट्रातील थंडीचे नेमके कारण काय? विषयी बोलताना ते म्हणाले, की ऑक्टोबर महिन्यात सुरु होणारे पश्चिमी झंजावात मार्च अखेर मंदावतात. परिणामी महाराष्ट्रासारख्या मध्य भारतातील राज्यात थंडीचा जोर मार्चमध्ये हळूहळू ओसरतो. सध्या खानदेश, नाशिक, नगर, पुणे, सातारा, मुंबईसह कोकण भागत समुद्रसपाटीपासून साधारण एक किलोमीटर उंचीच्या हवेच्या जाडीत तंतोतंत उत्तरेकडून पाऊस व बर्फावरील थंड वारे दक्षिणेकडे वाहत आहे.

Cold Weather
Weather Update : कमाल तापमानात वाढ होण्याचा हवामान विभागाचा अंदाज | ॲग्रोवन

त्यामुळे ८ मार्च महाशिवरात्री पर्यंत किंवा त्यानंतर चार ते पाच दिवस महाराष्ट्रात गारवा टिकून राहण्याची शक्यता जाणवते. त्यानंतर मात्र किमान व कमाल ही दोन्हीही तापमाने सरासरीच्या पातळीत येऊन हळूहळू चढतीकडे झेपावतील असे वाटते.

रब्बी पिकावर ह्या थंडीचा परिणाम काय होऊ शकतो याविषयी श्री खुळे म्हणाले की,  एल- निनोच्या वर्षात व शिवाय तोही सध्या अधिक तीव्रतेकडे झुकत असताना सध्यस्थितीतील रब्बी पिकांना शेवटच्या टप्प्यात काही ठिकाणी पाण्याची झळ बसत आहे. त्यातच अधिक तीव्रतेच्या पश्चिमी झंजावातातून मिळणाऱ्या ह्या थंडीपासून पिकांना चांगलाच दिलासाच मिळत आहे. शिवाय गारपीट  व पावसाळी वातावरणही सध्या निवळलेले जाणवत आहे. हा सर्व बदल रब्बी पिकासाठी जमेची बाजू समजावी, असेही खुळे यांनी स्पष्ट केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com