Weather Update Agrowon
हवामान

Maharashtra Rain : विदर्भात पुढील ५ दिवस पावसाचा अंदाज; राज्यात ठिकठिकाणी वादळी पावसाचा अंदाज

Weather Update : हवामान विभागाने पुढील ५ दिवस विदर्भासह राज्यातील इतर काही ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज दिला.

Anil Jadhao 

Pune News : राज्यातील काही भागात कडक ऊन तर काही भागात दुपारनंतर ढगाळ वातावरणासह वादळी पाऊस पडत आहे. हवामान विभागाने पुढील ५ दिवस विदर्भासह राज्यातील इतर काही ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज दिला. 

हवामान विभागाने कोकणातील सिंधुदूर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर, ठाणे आणि मुंबई जिल्ह्यातील काही भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला.

तर मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, पुणे, नगर आणि नाशिक तसेच खानदेश, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, नांदेड, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यात काही भागात विजा आणि मेघगर्जनेसह वादळी पावसाचा अंदाज दिला.

तर विदर्भातील बुलडणा, अकोला, अमरावती, नागपूर, वर्धा वाशीम, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदीया जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज दिला. 

उद्यापासून पुढील पाच ५ दिवस विदर्भात काही ठिकाणी विजा आणि वादळी पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला. तर मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागातही वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. तसेच राज्यात काही ठिकाणी ढगाळ हवामान आणि काही भागात उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT