Weather  Agrowon
हवामान

Weather Update : विदर्भात तयार होतेय पावसाला पोषक हवामान

Weather Forecast : राज्यात आकाश निरभ्र झाल्यानंतर जोरदार वारे वाहत आहेत. दिवसा उन्हाचा चटका वाढलेला असून, कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार होत आहे.

Team Agrowon

Pune News : राज्यात आकाश निरभ्र झाल्यानंतर जोरदार वारे वाहत आहेत. दिवसा उन्हाचा चटका वाढलेला असून, कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार होत आहे. आज (ता. २२) किमान, कमाल तापमानातील चढ-उतार सुरूच राहणार आहे. शनिवारपासून (ता. २४) विदर्भात पावसाला पोषक होण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत.

राज्यात कमाल तापमानाचा पारा ३५ अंशांच्या पार गेल्याने उन्हाच्या झळा वाढल्या आहेत. बुधवारी (ता. २१) सोलापूर येथे राज्यातील उच्चांकी ३७.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी किमान तापमान १५ अंशांच्या खाली असून, धुळे येथील कृषी विद्यालयात राज्यातील नीचांकी ९.४ अंशांची नोंद झाली आहे. आज (ता. २२) उन्हाचा चटका कायम राहणार असून, मध्य महाराष्ट्राच्या किमान तापमानातील घट कायम राहण्याची शक्यता आहे.

बुधवारी (ता. २१) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे ३४.३ (१३.३), धुळे ३५.० (९.४), जळगाव ३३.८ (१५.२), कोल्हापूर ३४.६ (१८.९), महाबळेश्वर २८.८ (१५.९), मालेगाव ३६.० (१७.६), नाशिक ३२.१ (१५.०), निफाड ३२.८ (१३.८), सांगली ३५.७ (१६.५), सातारा ३४.५ (१४.६), सोलापूर ३७.६ (१८.८), सांताक्रूझ ३२.९ (२०.८), डहाणू ३२.७ (१९.१), रत्नागिरी ३२.० (१७.६), छत्रपती संभाजीनगर ३३.४ (१८.२), नांदेड - (१८.०), परभणी ३५.४ (१७.८), अकोला ३६.१ (१७.९), अमरावती ३४.० (१८.१), बुलडाणा ३३.४ (१८.६), चंद्रपूर ३५.२ (१८.४), गडचिरोली ३३.६ (१७.०), गोंदिया ३३.५ (१७.८), नागपूर ३५.२(१६.८), वर्धा ३६.०(१८.४), वाशीम ३५.४ (१७.२), यवतमाळ ३७.० (१८.०).

राज्यात जोरदार वारे

बुधवारी (ता. २१) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये पंजाबच्या अमृतसर येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी ६.८ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. उत्तर भारतात १८० नॉट्स वेगाने जोरदार वारे वाहत आहे. महाराष्ट्रातही जोरदार वारे वाहत आहेत. आग्नेय मध्य प्रदेशपासून विदर्भ, तेलंगणा, रायलसीमा ते तमिळनाडू पर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. शनिवारपासून (ता. २४) विदर्भात पावसाला पोषक हवामान होण्याची शक्यता आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Farmer Loan Waiver : दुसऱ्या टप्प्यात कर्जमाफीचे ५ हजार ८६ कोटी रुपये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कर्जखात्यावर वितरीत

Wild Vegetable Conservation: रानभाज्यांच्या बियाणे बँकेसाठी प्रयत्न करा : प्रसाद

Fake Agricultural Products: नामवंत कंपनीच्या नावाने बनावट पोषकविक्री रॅकेटचा पर्दाफाश

Agrowon Podcast: तुरीच्या दरात चढ-उतार, हळदीच्या भावात बदल, वांगी दरात घसरण, पालकचे भाव टिकून तर संत्री दरात वाढ

International Agriculture Workshop: युवा शेतकरी प्रताप मारोडे यांची आंतरराष्ट्रीय कार्यशाळेसाठी निवड

SCROLL FOR NEXT