Rain Agrowon
हवामान

Weather Forecast : विदर्भ, मराठवाड्यात विजांसह पावसाचा अंदाज

Rain Update : उर्वरित कोकण, घाटमाथ्यावर जोरदार सरींचा, तर विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

अमोल कुटे

Pune News : बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्राच्या प्रभावामुळे पावसाला पोषक हवामान होत असल्याने कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. आज (ता. ७) रायगड जिल्हा आणि पुणे, सातारा जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे. उर्वरित कोकण, घाटमाथ्यावर जोरदार सरींचा, तर विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

बंगालच्या उपसागरात कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली आहे. त्याला लागूनच ७.६ किलोमीटर उंचीपर्यंत चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. उत्तर ओडिशा, दक्षिण पश्‍चिम बंगालच्या किनाऱ्याकडे येताना ही प्रणाली आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. मॉन्सूनचा आस असलेल्या कमी दाब पट्ट्याचे पश्‍चिम टोक सर्वसाधारण स्थितीवर असून, पूर्व टोक दक्षिणेकडे आले आहे. तो राजस्थानच्या बिकानेरपासून नर्नूल, सिधी, संबळपूर, कमी दाबाचे केंद्र ते उत्तर बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे. उत्तर प्रदेशापासून कमी दाब केंद्रापर्यंत आणखी एक हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.

राज्याच्या कमाल तापमानात चढ-उतार सुरूच असून, शुक्रवारी (ता. ६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये चंद्रपूर येथे उच्चांकी ३३.८ अंश तापमानाची नोंद झाली. राज्यात अनेक ठिकाणी कमाल तापमानाचा पारा ३० अंशांच्या पुढे गेला आहे. आज (ता. ७) कोकणातील रायगड जिल्हा आणि पुणे, सातारा जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे. उर्वरित कोकण, घाटमाथ्यावर जोरदार सरींचा, तर विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता आहे.

जोरदार पावसाचा इशारा

(ऑरेंज अलर्ट) :

रायगड, पुणे, सातारा.

जोरदार पावसाचा इशारा

(येलो अलर्ट) :

ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, कोल्हापूर.

विजांसह पावसाचा इशारा

(येलो अलर्ट) :

नंदुरबार, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

PM-KUSUM Scheme : पीएम कुसुम योजनेंतर्गत शेतजमिनीवर सौर प्रकल्पात महाराष्ट्राची पिछाडी; तर सौर कृषीपंप, ग्रीड जोडणीत आघाडी

Sharad Pawar: 'फडणवीसांना काय अधिकार आहे?' राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चेवर शरद पवार यांचा संतप्त सवाल

India US Trade Deal: भारत–अमेरिका व्यापार करार शेतकऱ्यांसाठी धोकादायक; शरद पवारांनी व्यक्त केली चिंता

Purushottam Unhale Retirement: आत्मा प्रकल्प संचालक उन्हाळे झाले निवृत्त

Entrepreneurship Workshop: महानिर्यात कार्यशाळेद्वारे सूक्ष्म व लघू उद्योजकांना मार्गदर्शन

SCROLL FOR NEXT