Rain Forecast Agrowon
हवामान

Maharashtra Rain Update : विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात विजांसह पावसाचा इशारा

Latest Rain Update : पावसाची दडीने राज्यात उन्हाच्या झळा तापदायक ठरत असताना राज्यात पावसाला पोषक हवामान होत आहे.

Team Agrowon

Weather Update Pune : पावसाची दडीने राज्यात उन्हाच्या झळा तापदायक ठरत असताना राज्यात पावसाला पोषक हवामान होत आहे. आज (ता. २) संपूर्ण विदर्भासह मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या दक्षिणेकडील जिल्ह्यात विजांसह पावसाचा इशारा आहे.

तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे. उर्वरित राज्यात हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा हिमालयाच्या पायथ्याकडे कायम आहे. ईशान्य बंगालच्या उपसागरात समुद्र सपाटीपासून ४.५ किलोमीटर उंचीवर, दक्षिण आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यालगत ३.१ मीटर उंचीवर, दक्षिण छत्तीसगडमध्ये समुद्र सपाटीपासून१.५ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांच्या स्थिती आहेत.

तर अंतर्गत कर्नाटक ते कोमोरिन भागापर्यंत समुद्र सपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीवर हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. उत्तर बंगालच्या उपसागरात उद्या (ता. ३) चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण होणार असून, त्याचा प्रभावामुळे मंगळवारपर्यंत हवेचा कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत.

राज्यात पावसाने उघडीप दिली असून, कमाल तापमानात वाढ झाली आहे. राज्यात उन्हाचा चटका आणि उकाडा तापदायक ठरत आहे.

आज (ता. २) विदर्भातील सर्व जिल्हे, मध्य महाराष्ट्रातील सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर आणि मराठवाड्यातील धाराशिव, लातूर, नांदेड जिल्ह्यात विजांसह पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे.

तुरळक ठिकाणी ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. उर्वरित राज्यात हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

विजांसह पावसाचा इशारा :

सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाभार्थ्यांवर सरकारची कारवाई; अनुदानाची वसुली, तुरुंगवासाचीही शक्यता?

Skill Training Centre: मराठवाड्यात सुरू होणार अत्याधुनिक कौशल्य प्रशिक्षण केंद्र

Bio Tech Farming : ‘के. बी. बायो’च्या वनस्पतिजन्य पीक संरक्षण तंत्रज्ञानाला मान्यता

Land Records Update: जमीन मालकी कायद्याची सिंधुदुर्गातून अंमलबजावणी

Khandesh Rain Update: खानदेशात पावसाची विश्रांती

SCROLL FOR NEXT