Rain Alert Agrowon
हवामान

Rain Alert : उत्तर कोकणासह उत्तर महाराष्ट्रात वादळी पावसाचा अंदाज

Rain Forecast : ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपासून उन्हाचा चटका वाढल्याने कमाल तापमान ३६ अंशांपार गेले. परतीच्या पावसाने हजेरी लावल्याने तापमानात घट झाल्याचे दिसून आले आहे.

अमोल कुटे

Pune News : राज्यात परतीच्या पावसाने हजेरी लावल्यानंतर पावसाचा जोर काहीसा कमी होत उघडीप मिळण्याची शक्यता आहे. आज (ता. १४) उत्तर कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी वादळी वारे, विजांसह पावसाच्या सरींची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) कायम आहे. तर राज्यात कमाल तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता आहे.

ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपासून उन्हाचा चटका वाढल्याने कमाल तापमान ३६ अंशांपार गेले. परतीच्या पावसाने हजेरी लावल्याने तापमानात घट झाल्याचे दिसून आले आहे. रविवारी (ता. १३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये परभणी येथे राज्यातील उच्चांकी ३३.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्यात उन्हाचा चटका कमी-अधिक होण्याची शक्यता आहे.

पावसाला पोषक हवामान असल्याने आज (ता. १४) कोकणातील पालघर, ठाणे, उत्तर महाराष्ट्र धुळे, नाशिक जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारे, विजांसह जोरदार सरींची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) आहे. उर्वरित कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात ढगाळ हवामान, विजांसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

रविवारी (ता. १३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले कमाल तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे ३१.६, जळगाव ३१.८, कोल्हापूर २९.७, महाबळेश्वर २७.६, नाशिक ३०.६, निफाड ३१.०, सांगली ३०.३, सातारा ३१.२, सोलापूर ३३.०, सांताक्रूझ ३३.३, डहाणू ३२.९, रत्नागिरी ३२.७, छत्रपती संभाजीनगर ३१.४, बीड २९.५, परभणी ३३.४, अकोला ३२.८, अमरावती ३३.०, भंडारा ३०.६, बुलडाणा २९.५, चंद्रपूर ३२.८, गडचिरोली ३०.६, गोंदिया ३३.३, नागपूर ३३.०, वर्धा ३३.०, यवतमाळ ३२.२.

नैॡत्य मोसमी वाऱ्यांचा (मॉन्सून) परतीचा प्रवास काहीसा अडखळत होत आहे. महाराष्ट्राच्या उत्तर भागात असलेल्या नंदुरबार जिल्ह्याच्या काही भागातून माघार घेतल्यानंतर तब्बल आठवडाभरापासून महाराष्ट्रातील परतीची मॉन्सूनची वाटचाल थांबली आहे. शुक्रवारी (ता. ११) उत्तर भारतातून मॉन्सूनने माघार घेतली. त्यानंतर मॉन्सून ‘जैसे थे’ आहे. परतीस पोषक हवामान असल्याने दोन दिवसांत मॉन्सूनची आणखी माघार होण्याचा अंदाज आहे.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे संकेत

अरबी समुद्रातील ठळक कमी दाबाचे क्षेत्र पश्चिमेकडे सरकून आणखी तीव्र होण्याचे संकेत आहेत. यातच बंगालच्या उपसागरातील चक्राकार वाऱ्यांमुळे नैॡत्य बंगालच्या उपसागरात आज (ता. १४) कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्रापासून श्रीलंकेपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.

विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

पालघर, ठाणे, धुळे, नाशिक.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT