Rain Alert Agrowon
हवामान

Maharashtra Rain Alert : दक्षिण महाराष्ट्रात वादळी पावसाचा अंदाज

Rain Update : मॉन्सूनने महाराष्ट्रातून परतीचा प्रवास सुरू केला असतानाच, राज्यात ‘ऑक्टोबर हीट’ तापदायक ठरत आहे.

अमोल कुटे

Pune News : मॉन्सूनने महाराष्ट्रातून परतीचा प्रवास सुरू केला असतानाच, राज्यात ‘ऑक्टोबर हीट’ तापदायक ठरत आहे. यातच राज्यात पावसाला पोषक हवामान असल्याने आज (ता. ७) महाराष्ट्राच्या दक्षिणेकडील भागात वादळी वारे, विजांसह जोरदार सरींची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) आहे. उर्वरित राज्यात उन्हाचा चटका कायम राहण्याबरोबरच तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

नैॡत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) परतीचा प्रवास पुन्हा सुरू केल्यानंतर शनिवारी (ता. ५) महाराष्ट्राच्या उत्तर भागात असलेल्या नंदुरबार जिल्ह्याच्या काही भागांतून माघार घेतली आहे. दोन ते तीन दिवसांत महाराष्ट्राच्या आणखी काही भागातून मॉन्सून परतण्यास पोषक हवामान आहे. बंगालच्या उपसागरात तमिळनाडू आणि आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यालगत चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. राज्यात पावसाने उघडीप दिल्याने उन्हाचा चटका आणि उकाडा तापदायक ठरत आहे.

रविवारी (ता. ६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये ब्रह्मपुरी येथे राज्यातील उच्चांकी ३६.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. अकोला, नागपूर, चंद्रपूर, वर्धा येथे तापमानाचा पारा पस्तिशीपार आहे. आज (ता. ७) महाराष्ट्राच्या दक्षिण भागात असलेल्या रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यांत वादळी वारे, विजांसह जोरदार सरींची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) कायम आहे. उर्वरित राज्यात उन्हाचा चटका कायम राहणार आहे. तुरळक ठिकाणी विजांसह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

रविवारी (ता. ६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :

पुणे ३२.९, जळगाव ३४.४, कोल्हापूर ३१.८, महाबळेश्‍वर २७.३, मालेगाव ३१.४, नाशिक ३१.४, निफाड ३२.३, सांगली ३२.८, सातारा ३२.१, सोलापूर ३४.३, सांताक्रूझ ३२.८, डहाणू ३३, रत्नागिरी ३३, छत्रपती संभाजीनगर ३१.५, बीड ३०.५, परभणी ३३.४, अकोला ३५.८, अमरावती ३४.८, भंडारा ३२.४, बुलडाणा २९.६, ब्रह्मपुरी ३६.२, चंद्रपूर ३५, गडचिरोली ३४, गोंदिया ३४.४, नागपूर ३५.६, वर्धा ३५, वाशीम ३३.२, यवतमाळ ३४.

विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर.

३५ अंशांपेक्षा अधिक तापमान असलेली ठिकाणे :

ब्रह्मपुरी ३६.२, अकोला ३५.८, नागपूर ३५.६, चंद्रपूर ३५, वर्धा ३५.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी नेमकी कधी?; मुख्यमंत्री फडणवीस यांची विधानसभेत महत्त्वाची माहिती

Tur Market Rate: तूर नोंदणीला २४ मार्चपर्यंत मुदतवाढ; आतापर्यंत हमीभाव खरेदीला अल्प प्रतिसाद

Chana Rain Impact: अवकाळी पावसानंतर हरभऱ्याचं संरक्षण कसं कराल?

Chana MSP Registration: हरभरा नोंदणी १ मार्चपासून; हमीभावाने हरभरा विक्रीसाठी नोंदणी आवश्यक

Unseasonal Rain: अवकाळी अन् गारपिटीचा तडाखा

SCROLL FOR NEXT