Weather Forecast Agrowon
हवामान

Monsoon Rain : राज्यभरात वादळी पावसाचा अंदाज; माॅन्सूनची राज्यातील आणखी काही भागात प्रगती

Weather Update : माॅन्सूनने आता मध्य महाराष्ट्र आणि मराठवड्याचा बहुतांशी भाग व्यापला आहे. माॅन्सूनने आजही काही भागात प्रगती केली.

Anil Jadhao 

Pune News : माॅन्सूनने आता मध्य महाराष्ट्र आणि मराठवड्याचा बहुतांशी भाग व्यापला आहे. माॅन्सूनने आजही काही भागात प्रगती केली. तसेच हवामान विभागाने आज आणि उद्या राज्यातील अनेक भागात पावसाचा अंदाज दिला. 

माॅन्सूनने आज राज्यातील आणखी काही भागात प्रगती केली. माॅन्सूनने आज कोकणे, मध्य महाराष्ट्र आणि मराठवड्याच्या आणखी काही भागात वाटचाल केली. माॅन्सूनने आता काही भाग वगळता संपूर्ण कोकण, मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, पुणे आणि नगर जिल्हा व्यापला.

तसेच मराठड्यातील धाराशिव, लातूर, बीड जिल्हा व्यापला. तसेच माॅन्सून आज नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी आणि नांदेड जिल्हाच्या आणखी काही भागात पोचला. माॅन्सूनची दिशा आज डहाणू, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, निजामाबाद, सुकमा, मलकानगरी आणि विजयानगरम भागात होती. माॅन्सूनच्या वाटचालीसाठी पोषक हवामान असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

त्यामुळे माॅन्सून पुढील दोन दिवसांमध्ये महाराष्ट्राच्या आणखी काही भागात दाखल होण्याची शक्यता आहे. तसेच गुजरातमध्येही माॅन्सून दाखल होईल, असा अंदाज आहे. माॅन्सून राज्याच्या अनेक भागात दाखल झाल्यानंतर राज्यात पावसाचाही जोर वाढला आहे. हवामान विभागाने आज राज्याच्या बहुतांशी भागात पावसाचा अंदाज दिला.

कोकण आणि सोलापूर, धाराशिव, लातूर आणि नांदेड जिल्ह्यात विजा आणि मेघगर्जनेसह वादळी पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला. तर उर्वरित राज्यात ठिकठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला. तसेच उद्याही राज्याच्या बहुतांशी भागात पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Alert: राज्यात १० जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट; दोन दिवस पावसाचा अंदाज

Gokrupa Amrut Production: जालना जिल्ह्यात २ लाख ५८ हजार लिटर ‘गोकृपा अमृत’ निर्मिती

American Armyworm: ३ उपायांनी करा मक्यावरील अमेरिकन लष्करी अळीचे नियंत्रण

Chilli Crop Management: मिरची पिकात वाढवर्धकांचा अनावश्यक वापर टाळा : डॉ. संजय पाटील

Sheep Grazing Permission: मेंढपाळांसाठी सरकारचा महत्त्वाचा निर्णय, २१ वन विभागांमध्ये मेंढी चराईसाठी परवानगी

SCROLL FOR NEXT