Monsoon Rain Agrowon
हवामान

Monsoon Rain : आणखी तीन दिवस पावसाचा जोर; राज्यातील ८ जिल्ह्यांना जोरदार पावसाचा रेड अलर्ट 

Anil Jadhao 

Pune News : राज्यातील अनेक भागात सध्या पाऊस हजेरी लावत आहे. कोकण, मध्य महाराष्ट्राचा घाटमाथा आणि पूर्व विदर्भात पावसाचा जोर काहीसा अधिक आहे. हवामान विभागाने पुढील ५ दिवस राज्यातील अनेक भागात कमी अधिक प्रमाणात पाऊस पडू शकतो, असाही अंदाज हवामान विभागाने दिला. 

हवामान विभागाने आज राज्यातील ८ जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला. कोकणातील रत्नागिरी आणि रायगड तसेच मध्य महाराष्ट्रातील सातारा आणि कोल्हापूर तर विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदीया जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला.

सिंधुदूर्ग, पालघर, ठाणे आणि मुंबई तसेच पुणे, विदर्भातील अमरावती, यवतमाळ, वर्धा आणि नागपूर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला. तर नगर, नाशिक मराठवाड्यातील जालना, परभणी, लातूर, हिंगोली आणि नांदेड तर विदर्भातील बुलडणा, अकोला, वाशिम जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला. 

उद्या कोकण आणि विदर्भात पावसाचा जोर अधिक आहे. विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्याला काही ठिकाणी अतिजोरदार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला. तर अमरावती, वर्धा, नागपूर, गडिचिरोली जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट आणि बुलडाणा, अकोला, वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्याला येलो अलर्ट देण्यात आला.

मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला. मध्य महराष्ट्रातील सातारा जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट तर पुणे, नगर, कोल्हापूर, नगर, धुळे आणि जळगाव जिल्ह्याला काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला. 

रविवारी पावसाचा जोर काहीसा कमी होण्याची शक्यता असली तरी मराठवाडा वगळता इतर भागात पावसाची हजेरी कमी अधिक प्रमाणात राहण्याचा अंदाज आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्राचा घाटमाथा, नाशिक, धुळे आणि जळगाव, संपूर्ण विदर्भात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट दिला. तर सोमवारी आणि मंगळवारी राज्यात पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pm Aasha Scheme : 'पीएम आशा'तून शेतकऱ्यांपेक्षा ग्राहकांचं कल्याण ?

Rain Maharashtra : राज्यात पावसाला पोषक हवामान; शुक्रवारी मराठवाड्याला 'येलो अलर्ट'  

Marathwada Mukti Sangram : मराठवाडा मुक्ती संग्रामाची गौरवशाली शौर्यगाथा

Soybean Yellow Mosaic : मळेगावातील सोयाबीनवर येलो मोझॅकचा प्रादुर्भाव

Poultry Business : भांडवलाअभावी पोल्ट्री व्यवसाय धोक्यात, सांगली जिल्ह्यात परिस्थिती

SCROLL FOR NEXT