Rain Forecast Agrowon
हवामान

Maharashtra Weather : राज्यात विजांसह पावसाचा इशारा कायम

Rain Forecast : आज (ता. १३) कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात तुरळक ठिकाणी वादळी वारे, विजांसह पावसाच्या सरींची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) कायम आहे.

अमोल कुटे

Pune News : राज्यात परतीच्या पावसाने हजेरी लावल्याने अनेक ठिकाणी दमदार सरी कोसळत आहेत. अरबी समुद्रातील ठळक कमी दाबाचे क्षेत्र पश्चिमेकडे सरकताच राज्यात पावसाचा जोर काहीसा कमी होण्याचे संकेत आहेत. आज (ता. १३) कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात तुरळक ठिकाणी वादळी वारे, विजांसह पावसाच्या सरींची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) कायम आहे.

ऑक्टोबर महिन्याच्या सुरूवातीपासून उन्हाचा चटका वाढल्याने कमाल तापमान ३६ अंशांपार गेले. परतीच्या पावसाने हजेरी लावल्याने शनिवारी (ता. १२) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये भंडारा व गोंदिया येथे राज्यातील उच्चांकी ३४.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उर्वरित राज्यात तापमानात घट झाल्याने पारा ३४ अंशांच्या खाली आला आहे.

राज्यात पावसाला पोषक हवामान असल्याने आज (ता. १३) कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात तुरळक ठिकाणी वादळी वारे, विजांसह जोरदार सरींची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) आहे. ढगाळ हवामानामुळे राज्यात उन्हाचा चटका कमी-अधिक होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

शनिवारी (ता. १२) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले कमाल तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे ३०.७, कोल्हापूर २९.४, महाबळेश्वर २५.५, नाशिक २९.५, निफाड ३०.१, सातारा ३०.२, सोलापूर ३२.१, सांताक्रूझ ३३.८, डहाणू ३२.१, रत्नागिरी ३२.५, छत्रपती संभाजीनगर ३१.३, बीड ३०.५, परभणी ३२.९, अकोला ३३.२, अमरावती ३२.४, भंडारा ३४.६, बुलढाणा ३१.०, चंद्रपूर ३२.०, गडचिरोली ३२.०, गोंदिया ३४.६, नागपूर ३२.२, वर्धा ३१.०, वाशीम ३३.६, यवतमाळ ३२.०.

मॉन्सूनच्या परतीसाठी पोषक हवामान

नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांचा (मॉन्सून) परतीचा प्रवास काहीसा अडखळत होत आहे. महाराष्ट्राच्या उत्तर भागात असलेल्या नंदूरबार जिल्ह्याच्या काही भागातून माघार घेतल्यानंतर तब्बल आठवडाभरापासून महाराष्ट्रातील परतीची मॉन्सूनची वाटचाल थांबली आहे. शुक्रवारी (ता. ११) उत्तर भारतातून मॉन्सूनने माघार घेतली तर परतीस पोषक हवामान असल्याने दोन दिवसात मॉन्सूनची आणखी माघार शक्य आहे.

दोन्ही समुद्रात कमी दाबाचे संकेत

अरबी समुद्रातील ठळक कमी दाबाचे क्षेत्र पश्चिमेकडे सरकत असताना आणखी तीव्र होण्याचे संकेत आहेत. यातच बंगालच्या उपसागरातील चक्राकार वाऱ्यांमुळे नैर्ऋत्य बंगालच्या उपसागरात उद्या पर्यंत (ता. १४) कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्रापासून श्रीलंकेपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.

विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नाशिक, नगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, बुलढाणा, वाशीम, चंद्रपूर, गडचिरोली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Laxman Hake: ओबीसींच्या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली, तरीही लक्ष्मण हाके मुंबईकडे जाण्यावर ठाम

Chemical Fertilizer Efficiency: विविध उपायांद्वारे वाढवा रासायनिक खतांची कार्यक्षमता

National Common Mobility Card: एसटीच्या सवलतीच्या प्रवासासाठी आजपासून नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड अनिवार्य; महिला, ज्येष्ठ नागरिकांसाठी महत्त्वाचा निर्णय

Madgyal Sheep Breed: ओळख माडग्याळ मेंढीची...

Sericulture Farming: रेशीम शेतीतून अर्थकारणाला गती

SCROLL FOR NEXT