Monsoon Agrowon
हवामान

Monsoon Rain : उद्यापासून पुन्हा पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भासह कोकण, मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर जोर वाढणार

Weather Update : कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना जोरदार ते अति जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिला.

Anil Jadhao 

Pune News : मागील दोन दिवसांपासून राज्याच्या अनेक भागात पाऊस कमी झाला. मात्र उद्यापासून कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाचा जोर पुन्हा वाढण्याचा अंदाज आहे. तसेच कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना जोरदार ते अति जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिला. 

हवामान विभागाने उद्या कोकणातील रत्नागिरी, रायगड आणि ठाणे तसेच मध्य महाराष्ट्रातील सातारा आणि पुणे जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. तर सिंधुदूर्ग, पालघर, कोल्हापूर, नाशिक, विदर्भातील अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदीया जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला.

तर मराठवाड्यातील जालना, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या सरी होतील, असाही अंदाज आहे. तर शनिवार कोकणातील सिंधुदूर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर, ठाणे आणि मुंबई जिल्ह्यात तर रविवार आणि सोमवारी  सिंधुदूर्ग, रत्नागिरी, रायगड जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला.

तर मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये शनिवार, रविवार आणि सोमवारी काही ठिकाणी जोरदार ते अति जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिला. शनिवारी संपूर्ण विदर्भातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावासाचा अंदाज हवामान विभागाने दिला.

तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड तसेच जळगाव जिल्ह्यात हलक्या सरी पडतील, असा अंदाज आहे. रविवारी आणि सोमवारी संपूर्ण विदर्भासह, मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये आणि मराठवड्यातही काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट आहे. खानदेशातील काही भागात हलक्या सरी पडतील, असाही अंदाज आहे. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Dues : थकीत ऊस बिलासाठी १० ऑगस्टला ठिय्या आंदोलन

Crop Damage Compensation: सहा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना दिलासा, शेतपिकांच्या नुकसानीसाठी ५ कोटी ५४ लाख मदत मंजूर

MAT Stay : भूवैज्ञानिक भरतीला ‘मॅट’कडून अंतरिम स्थगिती

Farmer Loan Waiver: आधार ई-केवायसीसाठी शुल्क आकारल्यास कठोर कारवाई : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Yavatmal Crop Insurance : यवतमाळच्या विम्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ

SCROLL FOR NEXT