Maharashtra Rain Update : कोकण, घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट

Rain News : आज (ता. ९) कोकण, घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) तर कोकण अनेक ठिकाणी मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी संततधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
Rain Alert
Rain AlertAgrowon
Published on
Updated on

Pune News : मॉन्सून सक्रिय झाल्याने मुंबई, कोकणासह घाटमाथ्यावर झाल्याने पावसाने घुमशान घातले आहे. अनेक ठिकाणी अतिवृष्टीने जनजीवन विस्कळीत झाले आहे. आज (ता. ९) कोकण, घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) तर कोकण अनेक ठिकाणी मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी संततधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा त्याच्या सर्वसाधारण स्थितीपासून दक्षिणकडे सरकला आहे. मॉन्सूनचा आस राजस्थानच्या जैसलमेरपासून, चित्तोडगड, रायसेन, मंडला, रायपूर, कलिंगापट्टनम ते मध्य बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे.

गुजरातपासून ते उत्तर केरळ किनाऱ्याला समांतर कमी दाबाचा पट्टा कायम आहे. आंध्र प्रदेशाच्या किनाऱ्यालगत समुद्र सपाटीसाठी ३.१ ते ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. दक्षिण महाराष्ट्रात परस्पर विरोधी वाहणाऱ्या पूर्व-पश्चिम वाऱ्यांचे जोडक्षेत्र तयार झाले आहे.

Rain Alert
Weekly Weather : हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता

सोमवारी (ता. ८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकण, मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस कोसळला. विदर्भ जोरदार तर उर्वरित राज्यात मध्यम ते जोरदार पावसाच्या सरींनी हजेरी लावली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग येथे ३०५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. कोकणासह घाटमाथ्यावर अनेक ठिकाणी १०० मिलीमीटर पेक्षा अधिक पावसाची नोंद झाली.

Rain Alert
Monsoon Rain : पावसाचा जोर २ दिवस राहणार; राज्यातील बहुतांशी भागात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज

राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. आज (ता. ९) कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पुणे आणि सातारा जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे. पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, कोल्हापूर, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ जिल्ह्यात जोरदार पावसाचा (येलो अलर्ट) आहे. उर्वरित मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता कायम आहे.

सोमवारी (ता. ८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात पडलेला पाऊस, मिलीमीटरमध्ये (सौजन्य : हवामान विभाग) :

कोकण :

मुंबई शहर : कुलाबा ८४, सांताक्रुझ २६८.

पालघर : वसई १२६.

रायगड : अलिबाग १४५, म्हसळा २७३, मुरूड २५५, पनवेल ९०, रोहा ९३, श्रीवर्धन १३१, तळा २८७.

रत्नागिरी : चिपळूण १७२, दापोली १९२, गुहागर ८७, हर्णे १७२, जयगड १२१, खेड १५८, लांजा १४४, मलगुंद १४४, मंडणगड १३०, राजापूर २३०, संगमेश्वर ११०, सावर्डे ९६, वाकवली २५१.

सिंधुदुर्ग : देवगड १९८, दोडामार्ग ३०५, कणकवली १९३, कुडाळ २३५, मालवण २१४, मुलदे (कृषी) २४५, रामेश्वर २५५, सावंतवाडी १८३, वैभववाडी १८५, वेंगुर्ला २१६.

ठाणे : ठाणे ११९.

मध्य महाराष्ट्र :

नगर : जामखेड ३८.

धुळे : शिरपूर ३२.

जळगाव : यावल ५३,

कोल्हापूर : आजरा ४७, चंदगड १२७, गगनबावडा १९४, शाहूवाडी ६०.

पुणे : लोणावळा कृषी ३८.

सांगली : कोकरूड ३२.

सातारा : महाबळेश्वर ५५, वाई ३३.

सोलापर : मंगळवेढा ३८, मोहोळ ४४, पंढरपूर ६७.

मराठवाडा :

बीड : माजलगाव २७, परळी वैजनाथ ४५, पाटोदा ४०.

धाराशिव : धाराशिव २५, तुळजापूर ६७, वाशी २६.

हिंगोली : वसमत २५.

लातूर : अहमदपूर ६५, जळकोट ५१, रेणापूर ३६.

नांदेड : अर्धापूर ७३, बिलोली ३४, देगलूर ३१, हादगाव ३०, हिमायतनगर २४, कंधार ४१, लोहा २५, मुखेड ६४, नायगाव खैरगाव ३१, नांदेड ३२.

परभणी : गंगाखेड ३७, पालम ३६, सोनपेठ २३.

विदर्भ :

अकोला : अकोला ८०, अकोट ३१, बाळापूर ९१, बार्शीटाकळी ५४, पातूर ३७, तेल्हारा ४७.

अमरावती : चांदूर रेल्वे ३९.

बुलडाणा : चिखली ३१, खामगाव ९२, मेहकर ३३, मातोळा ९०, नांदुरा ४४, शेगाव ३४.

चंद्रपूर : भद्रावती ४६, सिंदेवाही ३१.

गोंदिया : गोंदिया ४२, सालकेसा २२.

नागपूर : नागूपर कृषी महाविद्यालय ४५.

वर्धा : देवळी ५२, हिंगणघाट २२, वर्धा २९.

वाशिम : मालेगाव ३७, वाशिम २५.

यवतमाळ : बाभुळगाव २७, दारव्हा ४२, कळंब २२, मारेगाव ४६, पांढरकवडा ३४, राळेगाव २४, उमरेड २०, वणी ४१.

जोरदार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) :

रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा.

जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, कोल्हापूर, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ.

वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

धुळे, जळगाव, नाशिक, नगर, सोलापूर, सांगली, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, बुलढाणा, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.

१५० मिमीपेक्षा अधिक पाऊस पडलेली ठिकाणे :

सांताक्रुझ २६८ (मुंबई), म्हसळा २७३, मुरूड २५५, तळा २८७ (जि. रायगड), चिपळूण १७२, दापोली १९२, हर्णे १७२, खेड १५८, राजापूर २३०, वाकवली २५१ (जि. रत्नागिरी), देवगड १९८, दोडामार्ग ३०५, कणकवली १९३, कुडाळ २३५, मालवण २१४, मुलदे (कृषी) २४५, रामेश्वर २५५, सावंतवाडी १८३, वैभववाडी १८५, वेंगुर्ला २१६ (जि. सिंधुदुर्ग), गगनबावडा १९४ (जि. कोल्हापूर).

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com