Monsoon Rain Agrowon
हवामान

Monsoon Rain : पावसाचा जोर ओसरला; राज्यातील काही भागात पुढील ५ दिवस पावसाचा अंदाज कायम

Weather Update : हवामान विभागाने पुढील ५ दिवस राज्यातील अनेक भागात पावसाचा अंदाज दिला.

Anil Jadhao 

Pune News : राज्यातील अनेक भागात सततचा पाऊस आणि ढगाळ वातावरणाचा पिकांना फटका बसत आहे. सोयाबीनसह खरिप पिके पिवळी पडत असल्याचे शेतकरी सांगत आहेत. आज राज्यातील बहुतांशी भागात पावसाचा जोर कमी झाला. पण हवामान विभागाने पुढील ५ दिवस राज्यातील अनेक भागात पावसाचा अंदाज दिला. 

हवामान विभागाने आज रत्नागिरी, रायगड आणि सातारा जिल्ह्यात काही ठिकाणी अतिजोरदार पावसाचा रेड अलर्ट दिला. तर सिंधुदूर्ग, कोल्हापूर, पुणे आणि ठाणे जिल्ह्याला काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला.

तसेच परभणी, नंदूरबार विदर्भातील बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती, वर्धा आणि नागपूर जिल्ह्यात काही ठिाकणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट दिला. तर मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मध्यम ते हलक्या पावसाच्या सरी पडतील, असाही अंदाज हवामान विभागाने दिला. 

उद्या रत्नागिरी, रायगड, पुणे आणि सातारा तसेच चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदीया जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. तसेच सिंधुदूर्ग, कोल्हापूर, ठाणे, धुळे, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, बुलडाणा, वाशीम, अकोला, अमवरावती, वर्धा, नागपूर आणि भंडारा जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला. तसेच मराठवाडा आणि मध्य मराराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. 

रविवार, सोमवार आणि मंगळवारी कोकण, मध्य महाराष्ट्रातील घाटमाथा आणि विदर्भातील सर्व जिल्ह्यातील काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. तर मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी ५ जुलैनंतरच, अटी, निकषांमध्ये बदल, कृषिमंत्री भरणेंची विधानसभेत घोषणा

Turmeric Cultivation: जळकोट तालुक्यात शेतकऱ्यांची हळद लागवडीची लगबग

Agriculture Awards: नांदेडमधील चार शेतकऱ्यांना राज्यस्तरीय कृषी पुरस्कार जाहीर

Wildlife Management: जाळी लावून रोखला वन्यप्राण्यांचा उपद्रव

Smart Electricity Meter : वादातही सोलापूर मंडळात ४.१७ लाख स्मार्ट मीटर

SCROLL FOR NEXT