Monsoon Agrowon
हवामान

Retreat Monsoon : मॉन्सून लवकरच घेणार देशाचा निरोप

Monsoon Update : नैॡत्य मौसमी वाऱ्यांचा (मॉन्सून) परतीचा प्रवास काहीसा अडखळत होत आहे. सोमवारी (ता. १४) पूर्वोत्तर राज्यातून मॉन्सूनने माघार घेतली आहे.

Team Agrowon

Pune News : नैॡत्य मौसमी वाऱ्यांचा (मॉन्सून) परतीचा प्रवास काहीसा अडखळत होत आहे. सोमवारी (ता. १४) पूर्वोत्तर राज्यातून मॉन्सूनने माघार घेतली आहे. मॉन्सूनचा उर्वरित प्रवास वेगाने होणार असल्याने लवकरच मॉन्सून महाराष्ट्रासह देशाचा निरोप घेणार आहे. दक्षिण भारतात ईशान्य मोसमी वारे (ईशान्य मॉन्सून) सक्रिय होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

नैॡत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) २३ सप्टेंबर रोजी वायव्य राजस्थान आणि कच्छमधून परतीचा प्रवास सुरू केला. २४ सप्टेंबर रोजी राजस्थान आणि गुजरातच्या आणखी काही भागासह पंजाब आणि हरियानाच्या काही भागांतून मॉन्सून परतल्यानंतर मॉन्सूनची वाटचाल थबकली. २ ऑक्टोबर रोजी तब्बल आठ दिवसांनी मॉन्सूनने परतीचा प्रवास पुन्हा सुरू केला. ५ ऑक्टोबर रोजी मॉन्सूनने उत्तर प्रदेश, गुजरात, मध्य प्रदेशच्या आणखी काही भागासह, उ. महाराष्ट्र आणि अरबी समुद्राच्या आणखी काही भागांतून मुक्काम हलविला.

११ ऑक्टोबर रोजी उत्तर भारतातून परतलेल्या वाऱ्यांनी रविवारी (ता. १३) संपूर्ण पूर्व भारतातील राज्यांमधून माघार घेतली. सोमवारी (ता. १३) संपूर्ण पूर्वोत्तर राज्यातून मॉन्सून परतला. मॉन्सूनच्या परतीस पोषक हवामान असल्याने दोन दिवसांत संपूर्ण गुजरात, छत्तीसगड, ओडिशा, मध्य प्रदेशसह महाराष्ट्राच्या आणखी काही भागातून परतण्याची शक्यता आहे. त्यानंतरच्या दोन दिवसांत मॉन्सून संपूर्ण देशाचा निरोप घेण्याची शक्यता आहे. दक्षिण द्वीपकल्पावर ईशान्य आणि पूर्वोकडून वाहणाऱ्यांचा वाऱ्यांचा प्रभाव वाढणार असल्याने या भागात ईशान्य मोसमी वारे (ईशान्य मॉन्सून) सक्रिय होणार आहे.

अरबी समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र तीव्र झाले असून, (डिप्रेशन) ही प्रणाली ओमानकडे सरकत आहे. या प्रणालीपासून कोमोरीन भागापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा आहे. बंगालच्या उपसागरातील चक्राकार वाऱ्यांमुळे बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्मिती झाली आहे. ही प्रणाली ठळक होऊन, तमिळनाडू, द. आंध्र प्रदेशच्या किनाऱ्याकडे येण्याची शक्यता आहे.  

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Someshwar Sugar Factory Election: सोमेश्वरच्या कारभाऱ्यांचा आज होणार फैसला; मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष

Dimbhe Dam Water Leakage: डिंभे धरणातून होतेय पाण्याची गळ

Paddy Farmer Bonus: धान उत्पादकांना हेक्टरी २० हजार बोनस द्या : मुनगंटीवार

Mumbai APMC File Case: मुंबई राष्ट्रीय बाजार समितीत फाइल पळविल्याचा आरोप

Sugarcane Price: साडेपाच हजारांच्या ऊसदराचे गणित साखरेच्या भावावर अवलंबून

SCROLL FOR NEXT