Monsoon Rain Agrowon
हवामान

Monsoon Rain 2024 : पावसाचा जोर मंदावला

Rain Update : पावसाने काहीशी उघडीप दिली आहे. तसेच बुधवारी ही राज्यात पावसाचा जोर कमी असून अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण आहे.

अमोल कुटे

Pune News : पावसाचे वातावरण निवळल्याने पावसाचा जोर मंदावला आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडला. दरम्यान लोणावळा, शिरोटा, शिरगाव, कोयना, खोपोली, ताम्हिणी या घाटमाथ्यावरही मंगळवारी (ता. १६) पावसाने काहीशी उघडीप दिली आहे. तसेच बुधवारी ही राज्यात पावसाचा जोर कमी असून अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे धरणांतील पाण्याची आवक काहीशी कमी झाली आहे.

गेल्या पाच ते सहा दिवस राज्यातील विविध भागात मुसळधार पाऊस पडला. काही ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे राज्यातील धरणांत बऱ्यापैकी पाणी दाखल झाल्याने पाणीपातळी काही प्रमाणात वाढली होती. मराठवाडा, विदर्भात पडलेल्या पावसामुळे दिलासा मिळाला असला तरी पिके चांगलीच तरारली आहेत.

मंगळवारपासून ढगाळ वातावरण असले तरी छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, नांदेड, परभणी, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी पावसाचा शिडकावा झाला. तर विदर्भातील वाशीम आणि यवतमाळ जिल्ह्यात पावसाच्या हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी बरसल्या. तर यवतमाळमधील मालखेड मंडलात ७१ मिलिमीटर, सावर ५९.५, नेर ५६.८ मिलिमीटर पाऊस पडला. उर्वरित भागात तुरळक ठिकाणी पावसाच्या अधूनमधून सरी कोसळत आहे.

मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. यामध्ये महाबळेश्वर मंडलात सर्वाधिक ७०.८ मिलिमीटर पाऊस पडला. तर पूर्वभागात ढगाळ वातावरणाची स्थिती कायम होती. तर कोल्हापूर जिल्ह्यातही आंबा मंडलात ६६.३ मिलिमीटर पाऊस झाला.

उर्वरित भागात हलक्या सरी कोसळल्या. पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागात हलका पाऊस पडला. यामुळे भात खाचरे भरून वाहत आहेत. भात लागवडी वेगात सुरू झाल्या आहेत. नगर, सोलापूर, सांगली, नाशिक, नंदुरबार, धुळे जिल्ह्यांत काही ठिकाणी शिडकावा झाला.

कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. मात्र, मागील काही दिवसापासून पडत असलेल्या पावसामुळे या भागातील नद्या दुथडी भरून वाहत आहेत. ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यात पावसाच्या हलक्या सरी बरसल्या.

तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला असून पडझडीचे प्रकार सुरू आहेत. बुधवारी (ता. १७) पहाटे आंबोली (ता. सावंतवाडी) घाटरस्त्यावर दरड कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली.

तर भुईबावडा (ता. वैभववाडी) घाटरस्त्यातील संरक्षक भिंत कोसळली असून रस्त्याला भेगा पडल्या आहेत. दरम्यान सकाळपासून जिल्ह्यात सर्व पावसाच्या सरीवर सरी कोसळत आहेत. जिल्ह्यात मंगळवारी (ता. १६) पावसाचा जोर काहीअंशी कमी झाला होता.

परंतु सायकांळी उशिरा पुन्हा पावसाचा जोर वाढण्यास सुरुवात झाली. रात्री उशिरापर्यंत जोरदार पाऊस पडत होता. बुधवारी पहाटेपासून देखील जिल्ह्याच्या सर्व भागांत जोरदार पाऊस पडत आहे. या पावसामुळे नद्यांच्या पाणीपातळीत पुन्हा वाढ होण्यास सुरुवात झाली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton, Soybean Rate : कापूस, सोयाबीन, कांदा कुणाची बत्ती गूल करणार? कुणाला फायदा होणार? उद्या होणार उघड

ST Bus : एसटी महामंडळाच्या पन्नास टक्के फेऱ्या रद्द

Chana Cultivation : डहाणूत हरभरा लागवडीवर भर

La Nina Development : ला निना पुढच्या महिन्यात येणार? डिसेंबर ते फेब्रुवारीच्या दरम्यान निर्मितीचा अपेक हवामान केंद्राचा अंदाज 

Solapur Assembly Voting : वाढलेला एक टक्का कोणाच्या पारड्यात पडणार?

SCROLL FOR NEXT