Monsoon Rain Agrowon
हवामान

Rain Alert : राज्याच्या अनेक भागात पाऊस उघडीप देणार ; हवामान विभागाचा अंदाज

Rain Forecast : राज्यात सुरू असलेल्या पावसाचा जोर ओसरला असून, अनेक ठिकाणी ढगाळ हवामानासह ऊन-सावल्यांचा खेळ सुरू आहे.

अमोल कुटे

Pune News : राज्यात सुरू असलेल्या पावसाचा जोर ओसरला असून, अनेक ठिकाणी ढगाळ हवामानासह ऊन-सावल्यांचा खेळ सुरू आहे. आजपासून (ता. ६) राज्याच्या अनेक भागात पाऊस उघडीप देण्याची शक्यता आहे. कोकण, घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार सरींची तर विदर्भात विजांसह हलक्या पावसाची शक्यताही हवामान विभागाने वर्तविली आहे.

आग्नेय राजस्थान आणि परिसरावरील तीव्र कमी दाबाचे क्षेत्र निवळू लागले आहे. मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा राजस्थानमधील फालोदी ते कमी दाबाच्या क्षेत्राचे केंद्र ते चुर्क, पुरुलिया, दिघा, ते पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे. कमी दाबाच्या केंद्रापासून उत्तर ओडिशा पर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. दक्षिण गुजरातपासून ते उत्तर केरळ किनाऱ्याला समांतर कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.

सोमवारी (ता. ५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये घाटमाथ्यावरील ताम्हिणी येथे उच्चांकी २१० मिलीमीटर पावसाची नोंद झाला. नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा येथे २०० मिलीमीटर, तर लोणावळा येथे १९० मिलीमीटर, वळवण येथे १७०, जव्हार येथे १५० मिलीमीटर पावसाची नोंद झाली. कोकण, मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर काही ठिकाणी १०० मिलिमीटर पेक्षा अधिक पाऊस झाला. राज्यात पावसाने उघडीप दिली असून, ऊन सावल्यांचा खेळ पहायला मिळाला.

राज्यातील पावसाचा जोर ओसरल्यानंतर अनेक भागात पावसाची उघडीप मिळण्याची शक्यता आहे. आज (ता. ६) कोकणातील रायगड, रत्नागिरीसह पुणे, सातारा जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार सरींची 'येलो अलर्ट' आहे. तर विदर्भात विजांसह पावसाची शक्यता आहे. उर्वरित राज्यात पावसाची उघडीप मिळण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

मुसळधार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा.

विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Forest Rights Farmers Issue: वनहक्क पट्टेधारक शेतकरी ‘ॲग्रीस्टॅक’वरून ‘गायब’

Agriculture Inspection: पीक पाहणीचा पाठपुरावा करावा; ‘महसूल’च्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

Tobacco Streak Virus: कापसावर तंबाखू स्ट्रिक विषाणू ओळखा! नियंत्रणाचे उपाय काय?

Onion Farmers Issue: ‘बफर स्टॉक’चा कांदा शेतकऱ्यांच्या मुळावर

Sugarcane Transport Rule: ऊस वाहतुकीमध्ये बैलांना क्रूर वागवू नका; साखर आयुक्तालयाच्या कारखान्यांना सूचना

SCROLL FOR NEXT