Maharashtra Rain Update : पश्‍चिम, मध्य महाराष्ट्रासह कोकणात धो-धो बरसला

Rain News : घाटमाथा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात काही ठिकाणी रविवारी (ता. ४) धो-धो पाऊस बरसला. या भागातील ३५ मंडलात १०० मिलिमीटरहून अधिक पाऊस झाला.
Rain Update
Rain Update Agrowon
Published on
Updated on

Pune News : घाटमाथा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात काही ठिकाणी रविवारी (ता. ४) धो-धो पाऊस बरसला. या भागातील ३५ मंडलात १०० मिलिमीटरहून अधिक पाऊस झाला. तर रविवारी सकाळी आठ वाजेपर्यंतच्या २४ तासांत नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील घाटघर येथे सर्वाधिक ४७५ मिलिमीटर इतका विक्रमी पाऊस पडला. ताम्हिणी घाटमाथ्यावर २४०, लोणावळा २१२, मुळशी २१२ मिलिमीटर पाऊस झाला. पुणे, नगर, सातारा, नाशिक जिल्ह्यात धो-धो पाऊस कोसळला.

सततच्या पावसामुळे कोकणातील आणि मध्य-पश्‍चिम महाराष्ट्रातील नद्या दुथडी भरून वाहत आहेत. बहुतांश धरणे भरत आली आहेत. त्यामुळे कृष्णा, भीमा खोऱ्यातील धरणांतील विसर्गात वाढ करण्यात येत आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना, नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

गेल्या एक महिन्यापासून कोकण, घाटमाथा आणि मध्य महाराष्ट्राच्या पश्चिम भागात पावसाने धुमाकूळ घातला आहे. घाटमाथ्यावर काही वेळा पावसाचा जोर मंदावत असला तरी पुन्हा जोरदार सरी कोसळत आहेत. नगरमधील अकोले तालुक्यात पावसाच्या जोरदार सरी पडल्याने भंडारदरा धरण भरले. त्यातून विसर्ग निळवंडे धरणात सोडण्यात आला आहे. तर मुळा धरणांतही आवक सुरू आहे.

Rain Update
Monsoon Rain : जुलैअखेर सरासरीपेक्षा ३९ टक्के अधिक पाऊस

पुण्यातील कार्ला मंडलात सर्वाधिक २४४ मिलिमीटर पाऊस पडला. नाशिक जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे. सर्वदूर पाऊस पडत आहे. त्यामुळे धरणांतील पाणीपातळीत वाढ होऊ लागली आहे. पुणे जिल्ह्यातील २६ धरणांपैकी आत्तापर्यंत जवळपास १७ धरणे भरली आहेत. सर्व धरणांत एकूण १७०.३२ टीएमसी म्हणजेच ८६ टक्के पाणीसाठा झाला आहे. कृष्णा खोऱ्यातील धरणांतून विसर्ग सोडण्यात आल्याने नद्या भरून वाहत आहेत.

कोकणातील ठाणे जिल्ह्यात सर्वदूर पाऊस कोसळत आहे. अनेक ठिकाणी अतिवृष्टीसदृश पाऊस झाला आहे. तर रायगडमध्ये कमी-अधिक स्वरूपात पाऊस पडत आहे. पालघर जिल्ह्यात जोरदार पाऊस पडत आहे. मोखडा मंडलात ९० मिलिमीटर पाऊस झाला. त्यामुळे कोकणातील सर्वच नद्या भरून वाहत असल्याने धामणी, मध्य वैतरणा, भातसा, मोडकसागर, तानसा, विहार, तुळशी, बारवी ही सर्व धरणे भरली असून विसर्ग सोडण्यात आला आहे.

Rain Update
Rain Update : सांगली जिल्ह्यात जुलै महिन्यात २०९ टक्के पाऊस

मराठवाडा, विदर्भात जोर कमी

मागील चार ते पाच दिवसांपासून मराठवाड्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. तुरळक ठिकाणी पावसाचा शिडकावा होत आहे. विदर्भाच्या पूर्व भागात हलक्या स्वरूपाच्या सरी पडत आहेत. तर बुलडाण्यातील नरवेल, चांदूरबिस्वा मंडलात मध्यम पाऊस झाला. मात्र, मागील दोन दिवसांपूर्वीच्या पावसाने या भागातील नद्या अजूनही भरून वाहत आहेत. त्यामुळे धरणांतील पाणी पातळी वाढत आहे. तर इटियाडोह, कामठी खैरी ही धरणे शंभर टक्के भरली असून सिरपूर ८० टक्के, तोतलाडोह ८७ टक्के भरल्याने पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे.

...या घाटमाथ्यांवर सर्वाधिक पाऊस :

दावडी २४६, ताम्हिणी २४०, लोणावळा २१२, मुळशी २१२, भीरा १८९, आंबोणे १८०, वळवण १६०, शिरोटा १२४, खोपोली १३०, कुंडली १२२, भिवपुरी १०३,

खांड १०८, वानगाव १०२.

१०० मिमीहून अधिक पावसाची ठिकाणे ः

ठाणे, मुंब्रा १४३, टिटवाळा ११६, मुरबाड १४०, धसई १५९, देहरी २२८, नयाहडी १६६, सरळगाव ११२, किनहवळी १२४, वसींड ११८, डोळखांब १२४, गोरेगाव १३७, पनवेल, ओवले, कर्नाळा ११२, पवयंजे, मोराबी १२१, नेरळ १३८, कडाव १०७, कळंब १७५, कशेले ११६, कार्ला २४४, आंबेगाव २२६, लोणावळा २०१, उंबरठाणा, सुरगाना १७१, घोटी १४०, धारगाव ११२, हरसूल, थानापाडा १०४, काले १४०, माले, मुठे १२५, पानशेत १३१, महाबळेश्‍वर १३८, त्र्यंबकेश्वर १६१.

रविवारी (ता.४ ) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांतील मंडलनिहाय पाऊस (५० मिमीच्या पुढे) :

कोकण : बाळकुम ९२, दहिसर, बेलापूर ८७, कल्याण ९२, अप्पर ८७, ठाकुर्ली ९७, नडगांव ९९, भिवंडी ९२, अप्पर भिवंडी ९७, पडघा ९९, खारबाव ९२, शहापूर १२, खर्डी ९३, उल्हासनगर ८९, अंबरनाथ ८९, कुमभर्ली ८९, बदलापूर ९८, अगशी, विरार ५६, वाडा, कोणे ६७, कडूस ७७, कांचगड ८८, डहाणू, मालयण, कसा ६७, साइवन ८२, खोडला ८३, तलसरी ६९, झरी, विक्रमगड ५८, तलवड ८२.

मध्य महाराष्ट्र : डांगसौदाणे ५५, नवी बेज ५६, दळवट ७५, बाऱ्हे ९७, बोरगाव ७५, मनखेड ९७, नाशिक ७३, सातपूर ५६, गिरणारे ६५, माडसांगवी ५१, मखमलाबाद ५९, पाथर्डी ५६, उमराळे ६६, रामसेज ५७, वाडीवऱ्हे ७५, टाकेद ७६, पेठ ९२, जागमोडी ८७, कोहोर, निफाड ९८, दहाडेवाडी ९०, अकोले ५९, समशेरपूर ५६, राजूर, शेंडी ५२, कोतूळ, भोलावडे ८३, निरगुडसर ६९, वडगाव मावळ ५९, खडकाळा ७७, शिवणे ७७, वेल्हा ९६, विंझर ७६, वाडा, कुडे ६९, पाईट ५९, मेढा ५०, बामणोली ७१, केळघर ७५, करहर ४९, तापोळा ७७, लामज ७१.

थोडक्यात महत्त्वाचे...

- मध्य महाराष्ट्रात धरणातील पाण्याच्या विसर्गात वाढ

- घाटमाथा, मध्य महाराष्ट्र, कोकणात मुसळधार

- अकोले तालुक्याच्या पश्चिम पट्यात धोधो पाऊस

- पुणे जिल्हयातील धरणांतून पाण्याच्या विसर्ग वाढल्याने गावांना इशारा

- मराठवाडा, विदर्भात पावसाची उघडीप

- खानदेशात पावसाचा जोर वाढला

सर्वाधिक पावसाची ठिकाणे (मि.मी)

ठिकाणे---पडलेला पाऊस

घाटघर---४७५

रतनवाडी---४४९

पांजरे---४४५

भंडारदरा---२४५

दावडी---२४६,

कार्ला---२४४

तात्मिणी---२४०,

इगतपुरी---२४०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com