Weather Update Agrowon
हवामान

Weather Update : कमाल तापमानात होतोय चढ-उतार

Maharashtra Weather News : राज्याच्या कमाल तापमानात चढ-उतार सुरू आहे. मात्र पारा चाळिशी पार असल्याने उन्हाचा चटका तापदायक ठरत आहे. उन्हाचा चटका आणि उकाडा कायम आहे.

Team Agrowon

Pune Weather News : राज्याच्या कमाल तापमानात (Maximum Temperature) चढ-उतार सुरू आहे. मात्र पारा चाळिशी पार असल्याने उन्हाचा चटका तापदायक ठरत आहे.

उन्हाचा चटका आणि उकाडा कायम आहे. आज (ता. १८) कमाल तापमानात चढ-उतार कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.


बुधवारी (ता. १७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भातील गोंदिया येथे राज्यातील उच्चांकी ४२.८ तापमानाची नोंद झाली. तर चंद्रपूर येथे ४२.४ आणि वर्धा येथे ४२ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले.

अनेक ठिकाणी तापमान चाळीशीपार गेल्याने उन्हाचा चटका कायम आहे. उर्वरित राज्यात बहुतांश ठिकाणी तापमान ३५ ते ४० अंशांच्या दरम्यान होते.

उत्तर बिहारपासून मध्य छत्तीसगडपर्यंत समुद्र सपाटीपासून ३.१ किलोमीटर उंचीवर हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.

आंध्र प्रदेशापासून दक्षिण तमिळनाडूपर्यंत समुद्र सपाटीपासून ९०० मीटर उंचीवर हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे.

आज (ता. १७) राज्यात कमाल तापमानात चढ-उतार कायम राहणार असून, उष्ण व दमट हवामानामुळे चटका आणि उकाडा त्रासदायक ठरण्याची शक्यता आहे.

बुधवारी (ता. १७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) : पुणे ३६.२ (२१.३), जळगाव ४०.५ (२६.७), धुळे ४०.६, कोल्हापूर ३६ (२३.१), महाबळेश्वर ३०.२ (१७.७), नाशिक ३५.५ (२२.९), निफाड ३७.४ (२५.२), सांगली ३८.६ (२२.९), सातारा ३७ (२१), सोलापूर ४०.१ (२५),

सांताक्रूझ ३४.४ (२७), डहाणू ३५.६ (२७.८), रत्नागिरी ३५.२ (२६.७), छत्रपती संभाजीनगर ३८.४(२८), नांदेड ४०.६ (२६.४), परभणी ४०.३ (२६.२), अकोला ४१.७ (२७.९), अमरावती ४१.८(२४.७), बुलडाणा ३८.४ (२५), ब्रह्मपुरी ४१.२ (२६.३), चंद्रपूर ४२.४(२६), गडचिरोली ४१.२(२५.४), गोंदिया ४२.८ (२३.५), नागपूर ४१.८ (२५), वर्धा ४२ (२६.५), यवतमाळ ३९.५ (२६.२).

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

E-crop Survey: जांगडगुत्ता ई-पीकपाहणीचा!

Child Malnutrition: बालकांचे नव्हे, व्यवस्थेचेच पोषण!

Cooperative Societies: उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सहकारी संस्थांचा गौरव

Best Cooperative Bank: पीडीसीसी बँकेला ‘सर्वोत्कृष्ट सहकारी बँक’ पुरस्कार

Gram Panchayat Administration: शिरूर तालुक्यातील ७१ ग्रामपंचायतींवर प्रशासक

SCROLL FOR NEXT