Weather Forecast Agrowon
हवामान

Maharashtra Rain Alert : पावसाचा जोर कायम राहणार; राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज

Rain Forecast : हवामान विभागाने पुढील ५ दिवस राज्यातील अनेक भागात पावसाचा अंदाज व्यक्त केला.

Anil Jadhao 

Pune News : राज्यातील अनेक भागात पुन्हा पाऊस सुरु झाला. काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी मध्यम सरी पडल्या. हवामान विभागाने पुढील ५ दिवस राज्यातील अनेक भागात पावसाचा अंदाज व्यक्त केला. 

हवामान विभागाने आज राज्यभरात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज दिला. मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील सर्वच जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला. तर उद्या काही ठिकाणी अतिजोरदार पावसाची शक्यता आहे.

हवामान विभागाने उद्या मराठवाड्यातील बीड, परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज दिला. तर मध्य महाराष्ट्रातील सातारा आणि कोल्हापूर तर कोकणातील सिंधुदूर्ग, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिला. तर विदर्भातील सर्व जिल्हे, मराठवाड्यातील इतर जिल्हे आणि मध्य महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला. 

हवामान विभागाने पुढील ५ दिवस राज्यातील अनेक भागात पावसाचा अंदाज व्यक्त केला. बुधवारीही राज्यात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात अनेक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज दिला.

तर गुरुवारी दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या दक्षिण भागात पावसाचा जोर काहीसा कमी होण्याची शक्यता आहे. मात्र विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राच्या इतर भागात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाने दिला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Drought: दुष्काळ जाहीर होणार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

Indian Oil Trade: कच्च्या तेलाची आयात; पॅकबंद तेलाची निर्यात

India US Trade: अमेरिकेपुढे झुकण्याची घोडचूक नको

EL Nino 2026 : तेलंगणामध्ये पावसाची तूट; केंद्र सरकारकडे २० हजार कोटींच्या मदत पॅकेजची मागणी

Weekly Weather: उघडिपीसह अल्प पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT