Rain Agrowon
हवामान

Maharashtra Rain Alert : पावसाचा जोर ओसरणार

Heavy Rain Alert : आज (ता. २८) उत्तर महाराष्ट्र, विदर्भात विजांसह, मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.

अमोल कुटे

Rain Alert Districts: मॉन्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात झाल्यानंतर राज्यात सुरू असलेल्या पावसाचा जोर आजपासून निवळण्याचे चिन्हे आहेत. आज (ता. २८) उत्तर महाराष्ट्र, विदर्भात विजांसह, मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.

मध्य प्रदेश आणि परिसरावर समुद्रसपाटीपासून ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहे. दक्षिण गुजरातपासून वायव्य बिहारपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. पावसाळी वातावरण, ढगाळ हवामानामुळे राज्यातील उन्हाचा चटका कमी झाला आहे. शुक्रवारी (ता. २७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये वर्धा येथे राज्यातील उच्चांकी ३२.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

आज (ता. २८) उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. तर जळगावसह विदर्भातील बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, वर्धा, नागपूर जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज असल्याने दक्षतेचा इशारा (येलो अलर्ट) आहे. उर्वरित राज्यात पावसाचा जोर कमी होणार असून, पावसाची उघडीप मिळण्याची शक्यता आहे.

मॉन्सून परतीची वाटचाल थबकली

नैॡत्य मोसमी वाऱ्यांनी यंदाही काहीशा उशिराने परतीचा प्रवास सुरू केला आहे. सोमवारी (ता. २३) वायव्य राजस्थान आणि कच्छमधून परतीचा प्रवास सुरू केला. मंगळवारी (ता. २४) राजस्थान आणि गुजरातच्या आणखी काही भागांसह पंजाब आणि हरियानाच्या काही भागांतून मॉन्सून परतला. त्यानंतर मात्र मॉन्सून परतीची वाटचाल थबकली असून, फिरोजपूर, सिरसा, चुरू, अजमेर, माउंट आबू, दीसा, सुरेंद्रनगर ते जुनागडपर्यंत मॉन्सूनची परतीची सीमा कायम आहे.

जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

नंदुरबार, धुळे.

विजांसह वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) : जळगाव, बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, वर्धा, नागपूर.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Procurement Date Extension : कापूस खरेदीला १५ मार्चपर्यंत मुदतवाढ; शेतकऱ्यांसाठी सीसीआयचा महत्वाचा निर्णय

Sugarcane FRP: ऊस उत्पादक शेतकऱ्यांची ४,६०१ कोटी एफआरपी थकीत, ४५ कारखाने रडारवर

Raisin Export: बेदाणा निर्यात ८१ टक्क्यांनी घटली, द्राक्ष उत्पादक संकटात; सरकारची कबुली

Bageshwari Lake: बागेश्वरी तलाव परिसर पर्यटनाचे नवे केंद्र

Maize Procurement: मक्याचे दर घसरले; २५ हजार क्विंटल खरेदीवर ब्रेक

SCROLL FOR NEXT