Rain Agrowon
हवामान

Maharashtra Rain Forecast : पावसाचा जोर कमीच राहणार; माॅन्सूनचा परतीचा प्रवास आजही थबकलेला

Rain Update : हवामान विभागाने पुढील ५ दिवस राज्यातील काही भागात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज दिला आहे.

Anil Jadhao 

Pune News : राज्यातील काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पाऊस हजेरील लावत आहे. मात्र जोरदार सर्वदूर पाऊस नाही. तसेच माॅन्सूनचा परतीचा प्रवास आजही थबकला होता. हवामान विभागाने पुढील ५ दिवस राज्यातील काही भागात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज दिला आहे.

माॅन्सूनचा परतीचा प्रवास पुन्हा थबकला. माॅन्सूनने आतापर्यंत जम्मू आणि काश्मिर, लडाख-गिलगिट-बाल्टीस्तान-मुझफ्फराबाद, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब आणि हरियाना-चंदीगड-दिल्ली आणि राजस्थानच्या सर्व भागातून माघारी फिरला. तर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या काही भागातून माघार घेतली.

पण ३ दिवसांपासून माॅन्सून एकाच जागेवर होता. म्हणजेच आजही माॅन्सूनची सिमा नौटनवा, सुलतानपूर, पन्ना, नरमदापुरम, खरगोन, नंदूरबार आणि नवसारी भागात होती. माॅन्सून पुढील २ ते ३ दिवसांमध्ये गुजरात, मध्य प्रदेशच्या उर्वरित भागातून माघारी फिरेल. तर महाराष्ट्राच्या आणखी काही भागातून माघार घेईल, असा अंदाज हवामान विभागाने दिला.

हवामान विभागाने आज राज्यातील काही भागात हलक्या ते मध्यम सरी पडतील असा अंदाज दिला. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही ठिकाणी हलक्या मध्यम सरी पडतील, असा अंदाज आहे. तर उद्याही कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज दिला आहे.

गुरुवारीही कोकणातील सर्व जिल्हे, मध्य महाराष्ट्रातील सर्व जिल्हे आणि मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमधील काही ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी पडतील असा अंदाज आहे. तर पश्चिम विदर्भातही काही ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. शुक्रवारी विदर्भ वगळता राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Khandesh Temperature Rise: खानदेशात उष्णता वाढू लागली; शेतीकामांच्या वेळेत होतोय बदल

Weather Update: राज्यात ऊन, उकाडा वाढला; बहुतांशी भागांत किमान आणि कमाल तापमानात वाढ

Girna Dam: गिरणा धरणातून दुसरे आवर्तन

IAS Varsha Meena: प्रत्येक कुटुंबाला शुद्ध पाणी देण्याचा प्रयत्न करा : जिल्हाधिकारी वर्षा मीना

Medicinal Plants: औषधी वनस्पतींमुळे उत्पन्न वाढणार

SCROLL FOR NEXT