Vidarbha Rain  Agrowon
हवामान

Vidarbha Rain Update : विदर्भात पावसाचा जोर ओसरला

Vidarbha Rain Forecast : विदर्भात असलेले पावसाचे वातावरण ओसरले आहे. त्यामुळे पावसाने चांगलीच उघडीप दिली आहे.

Team Agrowon

Pune News : विदर्भात असलेले पावसाचे वातावरण ओसरले आहे. त्यामुळे पावसाने चांगलीच उघडीप दिली आहे. विदर्भातील गडचिरोली, नागपूर, भंडारा जिल्ह्यांत काही ठिकाणी हलक्या सरी बरसल्या. तर बुधवारी (ता. ११) सकाळी आठ वाजेपर्यंत गडचिरोलीतील बेलगाव येथे ८१ मिलिमीटर पाऊस पडला. यामुळे ओढ्या, नाल्यातील पाणीपातळी कमी झाली असून, या भागातील नुकसानीच्या प्रमाणात वाढ होत आहे.

गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पूर्व विदर्भात पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला होता. त्यामुळे नद्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाल्याने अनेक ठिकाणी शेतात पाणी शिरले होते. नागपूरमधील देवळापूर येथे ४९ मिलिमीटर, तर खाट, कोडामेंडी ४५, नावेगाव, नागरधन ३३, रामटेक ४०, मुसेवाडी, पारशिवणी ३७, आमडी ३६ मिलिमीटर पाऊस झाला.

भंडाऱ्यातील नाकडोंगरी येथे ६१ मिलिमीटर, तर शिवरा ५४, केंद्री ४५, कान्हाळगाव, गाऱ्हा ३१, खामारी ३० मिलिमीटर, गोंदियातील परसवाडा येथे ४८ मिलिमीटर, तिरोडा ४४, मुंडीकोटा ३२, बोधगाव देवी, अर्जुनी ३१ मिलिमीटर, चंद्रपूरमधील पोंभुर्णा येथे ५० मिलिमीटर, गडचिरोलीतील काढोली येथे ७०, तर कोर्ची ६३, कुरखेडा ५५, पुराडा ५२, अरमोरी ४५, आलापल्ली, कोटगुळ ३५, देसाईगंज ३१ मिलिमीटर पाऊस झाला. पश्‍चिम विदर्भात पाऊस नसला तरी अमरावतीतील चुर्णी येथे २१ मिलिमीटर पाऊस झाला.

मराठवाड्यात पावसाने उघडीप दिली असल्याने शेतीकामांना वेग येऊ लागला आहे. मात्र नांदेड जिल्ह्यातील हदगाव येथे ३३ मिलिमीटर, पिंपरखेड येथे ३१ मिलिमीटर पाऊस झाला. मध्य महाराष्ट्रात अंशतः ढगाळ वातावरण आहे. तर अधूनमधून शिडकावा होत आहे. पुणे जिल्ह्यातील वेल्हा येथे ६१ मिलिमीटर, साताऱ्यातील महाबळेश्‍वर येथे ३१ मिलिमीटर, तर लामज २८ मिलिमीटर पाऊस झाला. तर खानदेशातील मोलगी, वडफळी येथे ४७ मिलिमीटर पाऊस पडला. घाटमाथ्यावर हलका ते मध्यम पाऊस कोसळला. कोकणात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी बरसल्या.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fake Officer Threat: सभापतींच्या कार्यालयातील कृषी अधिकाऱ्याच्या धमकीने खळबळ

Symbiosis University: पुणेकरांच्या साक्षीने ज्ञानयोग्याचा सन्मान

Agri Reforms: राष्ट्रीय बाजारतळ उभारणीसाठी अधिनियमात होणार सुधारणा

Banana Export: माळशिरसमधून दररोज १० टन केळीची निर्यात

Sustainable Agriculture Day: डॉ. स्वामिनाथन यांचा जन्मदिवस शाश्‍वत शेती दिन

SCROLL FOR NEXT