Weather  Agrowon
हवामान

Weather Forecast : राज्यात उन्हाचा चटका वाढला; उत्तर भारतात पावसाचा इशारा

Weather Update : पुढील पाच कोरड्या हवामान राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

Dhananjay Sanap

Pune News : राज्यात पहाटेचा गारठा कमी झाला आहे. तर किमान तापमानात वाढ झाली आहे. दुपारी उन्हाचा चटकाही वाढू लागला आहे. राज्यात उन्हाचा चटका वाढू शकतो. तसेच पुढील पाच कोरड्या हवामान राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

मागील २४ तासात नाशिक येथे १४ अंश सेल्सियस सर्वात कमी तापमानाची नोंद झाली. तर पुढील चोवीस तासात किमान तापमानात ३ ते ४ अंश सेल्सियसने चढ-उतार राहील, असा अंदाजही हवामान विभागाने दिला आहे.

मागील आठवड्यात विदर्भ आणि मराठवाड्यात पावसानं हजेरी लावली. तर अनेक जिल्ह्यात अवकाळी पावसानं झोडपून काढलं. काही ठिकाणी गारपीटही झाली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या काढणीला आलेल्या पिकांचं मोठं नुकसान झालं.

आता मात्र राज्यात पुढील पाच कोरडं हवामान राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. जम्मू, काश्मीर, लडाख, गिलगिटस्तान बाल्टीस्तान आणि मुझफ्फरबादच्या बहुतांश भागात तसेच हिमाचल प्रदेशच्या काही भागात पाऊस आणि हिमवर्षाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

राज्यात मात्र कोरड्या हवामानाचा अंदाज देण्यात आला आहे. कोरड्या हवामानामुळे अनेक जिल्ह्यात काढणीलाही वेग आला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Industrial Investment : औद्योगिक गुंतवणुकीला सुरक्षा, सुविधा उपलब्ध करून देणार

Dairy Industry : सलग तीन महिने दूध संकलनात घट

Loan Waiver : दुसऱ्या टप्प्यात किती शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ?

Finlay Mill Amravati : फिनले मिलसाठी हवा ४१ कोटींचा निधी

Rainfall Deficit Impact: ऑगस्ट संपत आला तरी रान पेरणीविना ओस

SCROLL FOR NEXT