Weather  Agrowon
हवामान

Maharashtra Weather : राज्याच्या उत्तर भागात थंडी वाढली

Maharashtra Weather Forecast : उत्तर महाराष्ट्रात किमान तापमानाचा सातत्याने घसरत असून, निफाड येथील गहू संशोधन केंद्रात पारा १२.२ अंशांपर्यंत घसरल्याने हुडहुडी जाणवायला लागली आहे.

अमोल कुटे

Pune News : उत्तर महाराष्ट्रात किमान तापमानाचा सातत्याने घसरत असून, निफाड येथील गहू संशोधन केंद्रात पारा १२.२ अंशांपर्यंत घसरल्याने हुडहुडी जाणवायला लागली आहे. उर्वरित राज्यातही किमान तापमानात घट होत असतानाच, दक्षिणेकडील जिल्ह्यात मात्र पावासाला पोषक हवामान होत आहे. आज (ता. १२) राज्याच्या तापमानातील चढ-उतार कायम राहण्याची शक्यता आहे.

नैॡत्य बंगालच्या उपसागरात समुद्र सपाटीपासून ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांच्या स्थिती आहे. या वाऱ्यांच्या प्रभावामुळे आज (ता. १२) या भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. ही प्रणाली तमिळनाडू आणि श्रीलंकेच्या किनाऱ्याकडे येण्याचे संकेत आहेत. वरील प्रणालीपासून उत्तर आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा कायम आहे.

धुळे, नाशिक, महाबळेश्वर, पुणे, अहिल्यानगर, जळगाव येथे पारा १६ अंशांच्या खाली आला आहे. मध्य महाराष्ट्रात पहाटे वेळी गारठा वाढत आहे. राज्यात कमाल-किमान तापमानातील तफावत कायम आहे. सोमवारी (ता. ११) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये रत्नागिरी येथे उच्चांकी ३५.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आज (ता. १२) उत्तर महाराष्ट्रात गारठा कायम असून, तापमानातील चढ-उतार कायम राहणार आहे.

सोमवारी (ता. ११) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले कमाल आणि किमान तापमान (कंसात) तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे ३०.७ (१५.९), अहिल्यानगर ३०.० (१५.७), धुळे (१३.४), जळगाव ३३.० (१५.४), कोल्हापूर ३१.१ (१९.५), महाबळेश्वर २४.५ (१४.६), मालेगाव ३०.०, नाशिक ३०.७ (१४.१), निफाड ३०.० (१२.२), सांगली ३१.७ (१९.१), सातारा ३०.९ (१८.०), सोलापूर ३४.२ (२०.८), सांताक्रूझ ३४.९ (२२.२), डहाणू ३५.० (१९.४), रत्नागिरी ३५.१ (२२.१), छत्रपती संभाजीनगर ३१.५ (१७.४), धाराशिव (१७.८), परभणी ३०.९ (१७.८), अकोला ३३.४ (२०.४), अमरावती ३३.० (२२.०), बुलडाणा ३०.० (१८.०), ब्रह्मपुरी ३३.२ (१८.७), चंद्रपूर ३१.४ (१७.०), गडचिरोली ३१.६ (१७.६), गोंदिया ३०.९ (१६.८), नागपूर ३१.६ (१७.७), वर्धा ३१.२ (१८.५), वाशीम ३४.२, यवतमाळ ३१.० (१७.५).

१६ अंशापेक्षा कमी तापमान असलेली ठिकाणे : निफाड १२.२, धुळे १३.४, नाशिक १४.१, महाबळेश्वर १४.६, जळगाव १५.४, अहिल्यानगर १५.७, पुणे १५.९.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver Third List: कर्जमाफीची तिसरी यादी जाहीर, ३ लाख ५१ हजार १९२ शेतकऱ्यांचा समावेश

Sugar MSP: साखर 'एमएसपी' प्रश्नी दिल्लीतील बैठक निष्फळ, उद्यापासून महाराष्ट्र-कर्नाटकातील महामार्ग रोखणार, राजू शेट्टींचा इशारा

Canal Repair : पहिल्या आवर्तनापूर्वी कालव्यांची दुरुस्ती करा

Solar Irrigation : सातारा जिल्ह्यातील उपसा सिंचन योजना सौर ऊर्जेुळे उजळणार

Water Tanker Surge : टॅंकरच्या संख्येत झपाट्याने वाढ

SCROLL FOR NEXT